बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू अर्थात एमटीएचएलचे (MTHL) येत्या १२ जानेवरीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते उदघाटन होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (State Govt) या पुलावरून धावणाऱ्या कार अर्थात चारचाकी वाहनासाठी २५० रुपये इतका टोल निश्चित केला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी (०४ जानेवारी) झालेल्या बैठकीत टोल आकारणीच्या दरावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयामुळे मुंबईच्या टोल नाक्यात आणखी एका टोलनाक्याच्या भर पडली आहे. सर्वसाधारणपणे टोल आकारणीच्या नियमाप्रमाणे वाहनांसाठी येणाऱ्या दरापेक्षा ५० टक्के कमी दराने टोल आकारण्यात येणार असल्याचा दावा सरकारने केला आहे. (MTHL)
दीड ते दोन तासांच्या वेळेची बचत
एमटीएचएलवर (MTHL) कारसाठी ५०० ऐवजी २५० रुपये आकारण्यात येतील. वारंवार प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी परतीचा पास एकेरी टोलच्या दीडपट, दैनिक पास एकेरी टोलच्या अडीचपट आणि मासिक पास एकेरी टोलच्या ५० पट अशी सवलत देण्यात आली आहे. अटल सेतू उभारणीसाठी २१ हजार २०० कोटी रुपये इतका खर्च आला असून त्या पैकी १५ हजार १०० कोटी इतके कर्ज घेण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे पनवेलपासून दक्षिण मुंबईच्या दिशेने ये-जा करणाऱ्या वाहनांचे सुमारे १५ कि. मी. इतके अंतर कमी होईल. त्याचबरोबर गर्दीच्या वेळी सुमारे दीड ते दोन तासांच्या वेळेची बचत होईल. परिणामी इंधनावरील खर्चात वाहनाकरिता किमान ५०० रुपये इतकी बचत होईल, असा सरकराचा विश्वास आहे. (MTHL)
(हेही वाचा – Maratha Reservation : जरांगे-पाटील यांच्यासाठी शिवतिर्थाचे दरवाजे बंद)
पथकर दराचा एक वर्षानंतर आढावा
अटल सेतू या सागरी मार्गाच्या दोन्ही बाजूने शिवडी येथील फ्लेमिंगो पक्ष्यांच्या संरक्षणाकरिता पहिल्या शून्य ते चार किलोमीटर दरम्यान दोन्ही बाजूने ध्वनी संरक्षक आणि अतिसंवेदनशील अशा भाभा अणु संशोधन केंद्र तसेच, माहूल येथील तेल शुद्धीकरण केंद्र या चार ते दहा किलोमीटर अंतरामध्ये दृश्य अडथळे बसविण्यात आलेले आहे. अटल सेतूसाठी आकारण्यात येणाऱ्या पथकर दराचा एक वर्षानंतर आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल. (MTHL)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community