Radhanagari Forest मधील प्राणी गणनेत एकूण १८४ विविध प्राण्यांची गणना

128
Radhanagari Forest मधील प्राणी गणनेत एकूण १८४ विविध प्राण्यांची गणना

कोल्हापूर वन्यजीव विभागामार्फत दरवर्षी मे महिन्यामध्ये बुध्द पौर्णिमेदिवशी रात्री राधानगरी अभयारण्यामध्ये (Radhanagari Forest) प्राणी गणनेचा कार्यक्रम केला जातो. प्राणी गणनेमध्ये निसर्गप्रेमींना एक दिवस जंगलात राहण्याचा तसेच प्राण्यांचे दर्शन, आवाज, वनसंपदा व जैवविविधतेचा अनुभव मिळतो. दरवर्षी प्राणी गणनेस उदंड प्रतिसाद मिळतो. यातून जनसामान्यांना वन्यप्राणी व जंगलामध्ये वनविभागामार्फत करण्यात येत असलेली कामे, वनसंपदा टिकवण्यासाठी वनविभागाकडून करण्यात येत असलेले प्रयत्न याची माहिती होते. या गणनेमध्ये एकूण १८४ विविध प्रकारचे प्राणी व पक्ष्यांची गणना करण्यात आल्याची माहिती विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) एस.एस.पवार यांनी दिली आहे. (Radhanagari Forest)

सालाबादप्रमाणे यावर्षीही कोल्हापूर वन्यजीव विभागाअंतर्गत २२ मे रोजी बुध्द पौणिमेनिमित्त प्राणी गणना आयोजित करण्यात आली होती. ही प्राणी गणना राधानगरी जंगलातील विविध ठिकाणी एकूण २६ पाणस्थळांवर घेण्यात आली. यामध्ये एकूण ५० वनविभागाचे अधिकारी व वनकर्मचारी व २६ प्रगणकांनी (स्वयंसेवक) आपला सहभागी झाले होते. (Radhanagari Forest)

(हेही वाचा – Jitendra Awad यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी; डॉ. राजू वाघमारे यांची मागणी)

या कालावधीत दिसलेल्या वन्यप्राणी, पक्षी इत्यादींची माहिती खालीलप्रमाणे 

रानगवा – ७१, रानकोंबडा – २२, ससा – ६, भेकर – ५, उदमांजर – २, वटवाघूळ – १, घुबड – २, गरुड – १, साळींदर – १, मोर – ९, घोणस – १, वानर – १, सांबर – ५, शेकरु – ५, चिमणी – ३, डुक्कर – ५, घार – १, गेळा – १, रानडुक्कर – १, कापूगोडा – १, अस्वल – ९, वेडा राघू – १, सातभाई – ४, कासव – २, खंड्या – १, रानकुत्रा – १७, मुंगूस – १, शिंगडा घुबड – १, धनेश – १ व पक्षी ३ इतके प्राणी व पक्ष्यांची गणना करण्यात आल्याची माहिती वनविभामार्फत देण्यात आली आहे. (Radhanagari Forest)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.