ऑक्टोबर २०२२ मध्ये मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर कंपनी विकत घेतली. तेव्हापासून या कंपनीचा वेगळ्याच दिशेने प्रवास सुरू झाला. कधी कर्मचारी कपातीमुळे तर कधी ब्लू टिक हटवण्यामुळे ट्विटर नेहमी चर्चेत असतं. मस्क यांनी काही दिवसांपूर्वी नवीन घोषणा केली होती. त्यानुसार आता ट्विटरवरून ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल करणे शक्य होणार आहे.
ट्विटरच्या (Elon Musk) या फिचरमुळे आता व्हाट्सअँपचे (WhatsApp) महत्व कमी होईल का, असा प्रश्न उपस्थित होत होता. १० मे २०२३ रोजी ट्विटरने कॉलिंग फिचरची घोषणा केली. त्याच्या काही दिवस आधी एका ट्विटर कर्मचाऱ्याने व्हाट्सअँपच्या प्रायव्हसी पॉलीसीवर संशय व्यक्त केला होता.
(हेही वाचा – Password : ‘या’ १० प्रकारचे पासवर्ड कधीच ठेऊ नका; हॅकर्स लगेच ओळखू शकतात)
फोद डबिर यांनी ६ मे २०२३ ला स्क्रिनशॉटसह एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये त्यांनी मी झोपलो असतांनाही रात्रभर व्हाट्सअँपच्या (WhatsApp) बॅकग्राउंडला व्हाट्सअँप माइक हे फिचर सुरूच होते. (Elon Musk)
त्यामुळे आता व्हाट्सअँपच्या सुरक्षितेवर प्रश्न निर्माण होत आहेत. अशातच गेल्या काही काळात व्हाट्सअँपचा डाटा चोरीला गेल्याच्या अनेक घटना घडल्या. कंपनी युजर्सचे फोन नंबर, पत्ते आणि इतर खासगी माहिती मेटाला देत असल्याचा आरोप यामध्ये करण्यात आला होता. अशातच आता फोद यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे.
WhatsApp has been using the microphone in the background, while I was asleep and since I woke up at 6AM (and that's just a part of the timeline!) What's going on? pic.twitter.com/pNIfe4VlHV
— Foad Dabiri (@foaddabiri) May 6, 2023
कंपनीतल्या या कर्मचाऱ्याच्या ट्विटला मस्क (Elon Musk) यांनी प्रत्यक्ष उत्तर दिले नसले तरीही एलॉन मस्क यांनी यावर त्यांचे मत मांडले आहे. मस्क म्हणाले की, “कोणावरही विश्वास ठेवू नका.. “
Trust nothing, not even nothing
— Elon Musk (@elonmusk) May 9, 2023
केंद्रिय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी या आरोपाची दखल घेत “या घटनेमुळे गोपनीयतेचा भंग झाला आहे आणि त्याबाबत सरकार तातडीने तपास करेल” अशा शब्दांत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. (Elon Musk)
व्हाट्सअँपने दावा फेटाळला?
मात्र व्हाट्सअँप (WhatsApp) कडून हे आरोप फेटाळून लावण्यात आले आहेत. ९ मे २०२३ रोजी त्यांनी फोद यांच्या आरोपावर आपली भूमिका मांडली. ‘वापकर्त्यांच्या पिक्सल फोनमधीन एका बगमुळे हे झाले.’ असे व्हाट्सअँप कडून सांगण्यात आले आहेत.
Join Our WhatsApp Community