समर्पण सेवा चॅरिटेबल ट्रस्ट, मालाड, या दिव्यांगजनांच्या सेवेसाठी समर्पित असलेल्या संस्थेद्वारे मुंबई शहर तथा उपनगर मधील दिव्यांगांच्या विशेष शाळा कार्यशाळेतील कलाप्रेमी दिव्यांग विद्यार्थ्यांनी चित्रित केलेल्या चित्राकृतींचे प्रदर्शन शुक्र. दि. 18 नोव्हेंबर 2024 रोजी गोरेगाव स्पोर्ट्स क्लब फुटपाथ, लिंक रोड, मालाड पश्चिम येथे आयोजित करण्यात आले होते. मुंबई ही कलेची जननी आहे, मुंबईतील मान्यताप्राप्त चित्रकारांस जगात ओळख मिळते, यामुळे देशातील प्रत्येक कलावंतांची मुंबईतल्या नामांकित गॅलरीत प्रदर्शन करण्याची महत्त्वाकांक्षा असते, मात्र शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि विशेषतः कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या उपजत कलागुणांना संधी देण्यासाठी मुंबईतीलच नव्हे तर राज्यातील हा पहिला प्रयोग “समर्पण सेवा चॅरिटेबल ट्रस्ट” द्वारे करण्यात आला यामुळे संस्थेच्या वरील सर्व पदाधिकाऱ्यांचे कार्य दिव्यांगाप्रती असलेल्या सेवाभावी वृत्तीचे द्योतक आहे. (Art Exhibition)
या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार तथा प्राध्यापक सुरेंद्र जगताप, (जे. के. अकॅडमी ऑफ आर्ट अँड डिझाईन, वडाळा, मुंबई) यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमंत्रित चित्रकार तथा रोचीराम टी. थदानी हायस्कूल फॉर हिअरिंग हॅंडीकॅप, चेंबूर या शाळेचे कलाशिक्षक विलास पंडित, तसेच प्रमुख पाहुणे सुनीलजी काबरा, (कोषाध्यक्ष गोरेगाव स्पोर्ट्स क्लब) संजय मालू, (सचिव, गोरेगाव स्पोर्ट्स क्लब) आणि प्रथमेश शिवलकर, (प्रसिद्ध विनोदी मालिका-हास्य जत्रा फेम टीव्हीस्टार) हे उपस्थित होते. प्रसिद्ध मूर्तिकार तथा सदस्य बॉम्बे आर्ट सोसायटी, अजिंक्य चेऊलकर यांच्यासह कुसुमताई नरवणे कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या मुख्याध्यापिका शैला पाटील या आपल्या कर्णबधिर छोट्या चित्रकार विद्यार्थ्यांसह उपस्थित होत्या. यावेळी संपूर्ण कार्यक्रमांचे सांकेतिक भाषेत त्यांनी विद्यार्थ्यांना इंटरप्रीट केले. (Art Exhibition)
(हेही वाचा – तुम्हाला दक्षिण भारतातील hogenakkal falls बद्दल माहीत आहे का ? वाचा एका क्लिकवर )
कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर लट्टू यांनी केले. आपल्या प्रास्ताविकेत समर्पण सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्याचा लेखाजोखा त्यांनी मांडला. बदलत्या जीवनशैलीनुसार कलेला जनसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवायचे असेल तर त्यांच्या रोजच्या येण्या-जाण्याच्या ठिकाणी आपल्या कलाकृतींचे प्रदर्शन करणं हा यामागील हेतू आहे. तसेच दिव्यांगाप्रती संस्थेचे पुढील नियोजनात या फुटपाथ गॅलरीच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी स्टेज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी व्यक्त केले. या प्रदर्शनासाठी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अतिशय मेहनत घेऊन प्रदर्शन यशस्वी केले आहे. गोरेगाव स्पोर्ट्स क्लब व त्यांचे पदाधिकारी व सर्व मान्यवरांनी जे प्रोत्साहन दिले आहे ते कायमस्वरूपी आम्हाला लाभत राहो, अशी इच्छा हरीश जालान यांनी व्यक्त केली व त्यांचे आभार मानले. (Art Exhibition)
प्रदर्शित करण्यात आलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या या कलाकृती पाहून मी थक्क झालो असून कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या तोडीस-तोड असं असामान्य प्रतिभेचे काम या विद्यार्थ्यांनी केलं असून कला महाविद्यालयातील पुढील शिक्षणासाठी त्यांना मी माझ्या परीने पूर्णत: मदत करीन, असं आश्वासन सुरेंद्र जगताप यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. दैनंदिन जीवनातील व्यस्ततेमुळे चित्र प्रदर्शनाला भेट देण्याचा हा माझा पहिला प्रसंग असून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी देण्यासाठी गोरेगाव स्पोर्ट्स क्लब नेहमीच अग्रेसर राहील अशी ग्वाही सुनीलजी काबरा यांनी यावेळी दिली. गोरेगाव स्पोर्ट्स क्लब मध्ये 18 रूम असून या सर्व 18 रूममध्ये या प्रदर्शनातील चित्राकृती निवडून लावल्या जातील असे आश्वासन गोरेगाव स्पोर्ट्स क्लबचे सचिव संजय मालू यांनी दिले तर कार्यक्रम संपेपर्यंत त्यांच्या प्रतिनिधींनी 18 चित्रांची निवड करून खरेदी देखील केली. (Art Exhibition)
(हेही वाचा – Narayan Savarkar : वीराग्रणी डॉ. नारायण दामोदर सावरकर)
चित्र आणि अभिनय या दोन्ही कला एकमेकांशी पूरक असून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या या कलाकृती पाहून मी अतिशय प्रभावीत झालो असे भावोद्गार प्रथमेश शिवलकर यांनी काढले आणि प्रदर्शनातील एक कलाकृती खरेदी करून विद्यार्थ्यांच्या कलेचा सन्मान केला. या दिव्यांग विद्यार्थ्यांना हास्य-जत्रा या कार्यक्रमात एक संधी देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या विशेष शाळेत गेली 35 वर्षे कला शिक्षक म्हणून कलेचं शिक्षण देण्याचे अहोभाग्य मला मिळाले असून समर्पित भावनेने समर्पण सेवा चॅरिटेबल ट्रस्ट करत असलेल्या कार्यास मी सलाम करतो, असं मनोगत विलास पंडित यांनी व्यक्त केले. दिव्यांग विद्यार्थ्यांना सहानुभूतीची नव्हे तर संधीची गरज आहे. या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सामाजिक प्रतिष्ठा व आर्थिक स्थैर्य प्राप्त झाल्यास समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने जगता येईल यासाठी आपल्या संस्थेसोबत सोपवाल ती जबाबदारी उचलण्यास मी तयार आहे असे आश्वासनही त्यांनी दिले. (Art Exhibition)
प्रसिद्ध मूर्तिकार अजिंक्य चेऊलकर व समर्पण सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रमेश सावंत यांचेही संबोधन सभेपुढे झाले. किशोर नार्वेकर यांनी सहाय्य केलेल्या सर्व संस्थांचे, शाळांचे व विशेष करून गोरेगाव स्पोर्ट्स क्लबचे आभार व्यक्त केले. उपस्थित राहून प्रोत्साहन दिल्याबद्दल सर्व सभासदांचे आभार व्यक्त केले. मुंबई उपनगरातील कलादर्दींसाठी ही पर्वणी ठरणार असून होतकरू दिव्यांग चित्रकार शालेय विद्यार्थ्यांना आपल्या कलेच्या प्रदर्शनाची संधी यानिमित्ताने कायमच मिळणार असल्यामुळे उपस्थित सदाफुली शाळेच्या विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. सदर प्रदर्शन दि. 20 ऑक्टोबर 2024 पर्यंत रोज स. 10:00 ते सायं. 6:00 या वेळेत खुले असणार आहे. (Art Exhibition)
(हेही वाचा – Aditya Thackeray यांनी एबी फॉर्म दिले, आमदारांनी नाकारले; नक्की काय आहे आमदारांच्या मनात ?)
पत्ता – गोरेगाव स्पोर्टस क्लब फुटपाथ, लिंक रोड, मालाड पश्चिम
किशोर नार्वेकर
किशोर लट्टू
सचिव
समर्पण सेवा चॅरिटेबल ट्रस्ट
9322908569
हेही पहा –
Join Our WhatsApp Community