मुंबई गेट वे ऑफ इंडिया रेडिओ क्लब येथे सुसज्ज आणि दर्जेदार जेटी उभारावी; Nitesh Rane यांनी दिली सूचना

53
मुंबई गेट वे ऑफ इंडिया रेडिओ क्लब येथे सुसज्ज आणि दर्जेदार जेटी उभारावी; Nitesh Rane यांनी दिली सूचना
  • प्रतिनिधी

गेट वे ऑफ इंडिया येथील रेडिओ क्लब जवळ उभारण्यात येणाऱ्या नवीन जेटीचे काम अत्याधुनिक आणि सर्व सोयींनी युक्त असावे, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिल्या.

मंत्री राणे यांनी प्रत्यक्ष रेडिओ क्लब येथे जाऊन जेटीच्या उभारणीच्या कामाची पाहणी केली. यावेळी महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अभियंता पी. प्रदीप, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढिये, मुख्य अभियंता राजाराम पुरी गोसावी, मुख्य बंदर अधिकारी कॅप्टन खरा, मुख्य सागरी अभियंता प्रकाश चव्हाण, अधीक्षक अभियंता श्रीकांत बांगर आदी अधिकारी उपस्थित होते.

(हेही वाचा – महाडच्या Super Specialty Hospital साठी शासकीय जमीन; चंद्रशेखर बावनकुळे, प्रविण दरेकरांच्या प्रयत्नांना यश)

नवीन जेटी प्रवाशांसाठी आणि पर्यटनासाठी लाभदायक

रेडिओ क्लब येथील जेटी प्रवासी वाहतूक तसेच पर्यटनाच्या दृष्टिकोनातून उपयुक्त ठरणार असल्याचे सांगून मंत्री राणे (Nitesh Rane) म्हणाले, “या जेटीचे काम दर्जेदार आणि उच्च गुणवत्तेचे असावे. त्यासाठी लागणाऱ्या सर्व शासकीय परवानग्या तातडीने मिळवाव्यात. तसेच, हे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करावी.”

त्यांनी असेही स्पष्ट केले की, सध्याच्या जेटीवरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने नवीन जेटी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे हे काम त्वरित आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावे, अशी सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.

(हेही वाचा – Dr. Neelam Gorhe यांनी राज्यातील शैक्षणिक धोरणावर केली गंभीर टीका; म्हणाल्या, विद्यार्थ्यांच्या परीक्षा…)

नवीन जेटीमध्ये असणाऱ्या सुविधा

रेडिओ क्लब येथे प्रवासी आणि पर्यटकांसाठी अत्याधुनिक टर्मिनल इमारतीसह विविध सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. या सुविधांमध्ये –

टर्मिनल प्लॅटफॉर्म : ८० मीटर बाय ८० मीटर
टर्मिनल इमारत : आधुनिक सोयींनी युक्त
जेटी : २१४ मीटर लांब आणि १२ मीटर रुंद
अँफिथियेटर : ३५० लोकांची बसण्याची व्यवस्था
प्रतीक्षालय आणि प्रसाधनगृह
पाणपोई आणि अग्नी सुरक्षा प्रणाली
सीसीटीव्ही यंत्रणा

यावेळी मंत्री राणे (Nitesh Rane) यांनी संपूर्ण गेट वे ऑफ इंडिया ते रेडिओ क्लब परिसराची पाहणी केली आणि कामाच्या सध्याच्या स्थितीची सविस्तर माहिती घेतली.

ही जेटी पूर्ण झाल्यानंतर प्रवासी वाहतूक आणि पर्यटन उद्योगाला मोठा फायदा होणार असून, मुंबईतील समुद्र पर्यटनासाठी हे एक महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.