राज्यातील शासकीय आणि अनुदानित शाळांमध्ये आधार कार्ड असलेल्या विद्यार्थ्यांनाच आता शालेय पोषण आहाराचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे येत्या डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढून ते शालेय पोषण आहाराशी जोडण्याचे निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.
( हेही वाचा : Mahrashtra Tourism : मुंबई-पुण्यातील मानाच्या बाप्पांचे दर्शन! आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही; असे करा बुकिंग)
शालेय पोषण आहारासाठी ‘आधार कार्ड’ अनिवार्य
शासन निर्णयानुसार, वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाभार्थ्यांचा डेटा तयार करून तो आधार कार्डशी जोडला जाणार आहे. शिक्षण संचालनालयाने दिलेल्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेचा लाभ मिळावा यासाठी शिक्षक विशेष प्रयत्न करत आहेत तसेच ज्या विद्यार्थ्यांचे अद्याप आधार कार्ड काढले नाहीत अशा मुलांचे आधार कार्ड काढावेत यासाठी पालकांकडे आग्रह धरला जात आहे.
संबंधित लाभार्थी विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करून घेम्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाते नियोजन करावे त्याचप्रमाणे दर महिन्याच्या २८ तारखेपर्यंत या विद्यार्थ्यांची माहिती सादर करावी अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून संबंधित सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
Join Our WhatsApp Community