Aadhaar Card Update : आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत १४ डिसेंबरपर्यंत वाढवली

Aadhaar Card Update : माय आधार पोर्टलवरून आधारमधील बदल तुम्ही ऑनलाईनही करू शकता.

169
Aadhaar Card Update : आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत १४ डिसेंबरपर्यंत वाढवली
  • ऋजुता लुकतुके

आधार कार्डात नाव, पत्ता, मोबाईल नंबर असे कुठलेही बदल करायचे झाल्यास ते तुम्ही माय आधार पोर्टलवर ऑनलाईनही करू शकता. असे बदल विनामूल्य करण्यासाठी आधार सेवा देणाऱ्या युआडीएआय या संस्थेनं मुदतही १४ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. शिवाय ही प्रक्रिया तुम्ही ऑनलाईन आणि कुणाचीही मदत न घेता करू शकणार आहात. (Aadhaar Card Update)

तुमचं आधार कार्ड १० वर्षांहून जुनं असेल तर ते अपडेट करण्याचा सल्लाही युआडीएआयने दिला आहे. शिवाय आधार कार्डावरील तपशील, जसं की, पत्ता, नाव, वाढदिवस, सही, मोबाईल क्रमांक यातील काहीही बदललं असेल तर तुम्हाला नवीन आधार कार्ड घ्यावं लागेल आणि ही प्रक्रिया १४ डिसेबरपर्यंत कोणतंही शुल्क न भरता तुम्हाला करता येणार आहे. ही मुदत संपल्यावर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ५० रुपये शुल्क भरावं लागेल. (Aadhaar Card Update)

(हेही वाचा – BJP ला सरकार स्थापन करण्यास Shiv Sena, NCP चा पाठिंबा; फडणविसांचा मार्ग मोकळा!)

माय आधार पोर्टलवर ऑनलाईन ही प्रक्रिया कशी करायची ते पाहूया
  • सगळ्यात आधी myaadhaar.uidai.gov.in या वेबसाईटवर जा.
  • तिथे माय आधारवर क्लिक करा.
  • माय आधार विभागात अपडेट युअर आधार (update your aadhaar) वर क्लिक करून पुढे अपडेट आधार डिटेल्स ऑनलाई update aadhaar details (online) हा पर्याय निवडाआणि शेवटी अपलोड डॉक्युमेंटवर (upload document) क्लिक करा. इथं तुम्हाला संबंधित कागदपत्राची स्कॅन केलेली प्रत अपलोड करायची आहे.
  • नंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक भरावा लागेल आणि ओटीपी मागून घ्यावा लागेल.
  • तुमच्या आधारशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल आणि तो भरल्यावर तुमचा अर्ज पूर्ण होईल.

(हेही वाचा – Rahul Gandhi यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्याची मागणी?)

सुरुवातीला आधारमधील माहिती अपडेट करण्याची मुदत १४ जून होती. ती वाढत आता १४ डिसेंबरपर्यंत गेली आहे. आधार अपडेट करणं हे बंधनकारक नाही. पण, हे महत्त्वाचं ओळखपत्र आहे. त्यामुळे युआयडीएआय ते नियमितपणे अपडेट करण्याचं आवाहन तुम्हाला करत असतं. सरकारी फायदे मिळवताना, तसंच ओळखपत्र म्हणून अगदी आयकर भरतानाही या कार्डाचा तुम्हाला उपयोग होतो. (Aadhaar Card Update)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.