केंद्र सरकारने पॅन – आधार लिंक करण्यासाठी आता ३ महिन्यांची म्हणजेच ३० जून २०२३ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी सरकराने पॅन-आधार लिंक करण्यासाठी ३१ मार्च २०२३ ही डेडलाईन ठरवली होती परंतु यात आता वाढ करण्यात आली आहे.
( हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातील घरासमोर बॉम्ब ठेवल्याचा फोन! )
त्यामुळे पॅन-आधार लिंक करण्याची ही शेवटची संधी असून यानंतक मात्र दंड आकारण्यात येणार आहे. आयकर विभाग आणि सरकारने आधार पॅन लिंक करण्याची मुदत वाढवली असल्याची माहिती ट्विटरवरून दिली आहे.
तसेच ज्या ग्राहकांना अजूनही पॅन-आधार लिंक केले नाही त्यांनी त्वरीत लिंकिंग प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आले आगे. ३० जून २०२३ नंतर पॅन आधार लिंक नसेल तर त्या संबंधित नागरिकांचे पॅन कार्ड निष्क्रिय करण्यात येणार आहेत व १ हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. त्यामुळेच लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करा.
तुमचे पॅन-आधार लिंक आहे की नाही? कुठे तपासाल?
- या वेबसाईटला भेट द्या.
https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/link-aadhaar-status - या वेबसाईटवर तुम्हाला तुमचा आधार आणि पॅन क्रमांक समाविष्ट करावा लागेल.
- यानंतर व्हू आधार – पॅन लिंक स्टेटसवर क्लिक करा आणि तुम्हाला तुमची लिकिंग प्रक्रिया पूर्ण झाली आहे की नाही ते लगेच कळेल.
https://twitter.com/PIB_India/status/1640648842272989186
Join Our WhatsApp Community