Aadhaar Update : आधारकार्ड मोफत अपडेट कसं करायचं? काय आहे प्रक्रिया?

Aadhaar Update : दर १० वर्षांनी आधार कार्डातील माहिती अपडेट करणं अनिवार्य आहे.

1480
Aadhaar Update : आधारकार्ड मोफत अपडेट कसं करायचं? काय आहे प्रक्रिया?
  • ऋजुता लुकतुके

आधार कार्ड धारकांना अनेक कारणांसाठी त्यामधील माहिती दुरुस्ती करायची असते. अनेकदा काही जणांचा पत्ता बदलेला असतो. काही जणांच्या नावात बदल झालेला असतो. तर, अनेकांची जन्मतारीख नोंदवायची राहून गेलेली असते. किंवा आधार कार्डातील माहिती दर १० वर्षांनी अपडेट करणं हे कायद्यानेही बंधनकारक आहे. आताही आधार कार्डातील बायोमेट्रिक माहिती अपडेट (Aadhaar Update) करण्यासाठी १४ सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे. अशाप्रकारची माहिती बदलण्यासाठी आधारकेंद्रात जावं लागतं. पण, युएआयडीएनं काही बँकांनाही असं आधार नोंदणी केंद्र चालवण्याची परवानगी दिली आहे. तेव्हा नजीकचं आधार नोंदणी कार्यालय किंवा केंद्र कसं शोधायचं ते पाहूया,

आधार नोंदणी केंद्र शोधण्यासाठी तीन पर्याय उपलब्ध आहेत. तुम्हाला प्रथम यासाठी यूनिक आयडेंटीफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या https://appointments.uidai.gov.in/easearch.aspx या वेबसाईटला भेट देणं आवश्यक आहे. या वेबसाईटला भेट दिल्यानंतर आधार नोंदणी केंद्र शोधण्यासाठी राज्य, पोस्टल पिनकोड आणि सर्च बॉक्स या तीन पर्यायांचा वापर करता येईल.

(हेही वाचा – Shakib Al Hasan : शकीब अल हसनवर अटकेची टांगती तलवार)

राज्य हा पर्याय निवडल्यास तुम्हाला प्रथम राज्य निवडावे लागेल. इथं आधार कार्ड धारक महाराष्ट्रातील असल्यास तुम्हाला महाराष्ट्र निवडायचे आहे. त्यानंतर जिल्हा, उपविभाग किंवा तालुका, गाव, शहर नोंदवा, यानंतर कायम स्वरुपी नोंदणी केंद्र दाखवा या चेक बॉक्सवर क्लिक करावं लागेल, यानंतर कॅप्चा कोड नोंदवून तुम्ही तुमच्या जवळचं आधार नोंदणी केंद्र कोणतं आहे ते पाहू शकता. पोस्टल पिनकोड पर्यायाचा वापर केल्यास तुम्हाला तुम्ही राहता त्या ठिकाणाचा सहा अंकी पिनकोड आधार च्या वेबसाईटवर नोंदवावा लागेल. यानंतर कॅप्चा क्रमांक नोंदवून आधार नोंदणी केंद्र शोधता येईल. सर्च बॉक्स हा पर्याय निवडल्यास तुम्हाला तुमच्या गावाचं किंवा शहराचं नाव नोंदवाव लागेल. यानंतर कॅप्चा कोड नोंदवून तुम्ही आधार नोंदणी केंद्र शोधता येईल. (Aadhaar Update)

(हेही वाचा – Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या विधानसभेत अपराजिता महिला-बाल सुरक्षा विधेयक सादर!)

आधार कार्ड काढून १० वर्ष झाली असल्यास त्यातील माहिती आणि बायोमेट्रिक नोंदी अपडेट करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. यूआयडीएआयनं यासाठी मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळं तुम्हाला जर आधार कार्ड काढून १० वर्ष पूर्ण झाली असतील तर ते अपडेट (Aadhaar Update) करणं आवश्यक आहे. यासाठी तुम्ही वर दिलेल्या आधार नोंदणी केंद्र कसं शोधायचं याबाबतच्या माहितीचा उपयोग करुन घेऊ शकता. दरम्यान, आधार कार्ड अपडेट करण्यासाठी अधिकृत केंद्रावर भेट देऊनचं आधार कार्डमधील माहिती अपडेट करावी.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.