-
ऋजुता लुकतुके
आधार कार्ड हे देशातील एक महत्त्वाचं ओळखपत्र आहे. आणि सरकारी नियमानुसार, दर दहा वर्षांनी आधार कार्ड अपडेट (Aadhaar Update) करणं महत्त्वाचं आहे. शिवाय पत्ता, फोटो किंवा इतरही महत्त्वाची माहिती आधार कार्डात अपडेट (Aadhaar Update) नसेल तर असं आधारकार्ड वैध नाही. त्यामुळे हे बदल करणं हे महत्त्वाचं काम आहे. युआयडीएआयने १ज वर्षं जुनं आधार कार्ड मोफत अपडेट (Aadhaar Update) करून देण्याची सुविधा सध्या उपलब्ध करून दिली आहे. आणि मुदत १४ सप्टेंबरपर्यंतच आहे. त्यानंतर आधार अपडेटसाठी (Aadhaar Update) तुम्हाला शुल्क भरावं लागेल. त्यामुळे उरलेल्या ५ दिवसांत तुमचं जुनं आधारकार्ड नक्की अपडेट करून घ्या.
आधार कार्ड आता आपल्या ओळखीच्या पुराव्यांतील सर्वात महत्त्वाचा पुरावा बनलं आहे. ट्रेनचा पास काढणं असो वा बँक अकाउंट उघडणं, सगळ्या महत्त्वाच्या कामांसाठी आधार कार्ड आवश्यक आहे. पण, एका ठरावीक वेळनंतर आधार कार्ड अपडेट (Aadhaar Update) करणं आवश्यक आहे. जर तुमचं आधार कार्ड १० वर्षांपूर्वीचं असेल, तर तुम्हाला ते अपडेट करणं अनिर्वाय आहे. सध्या युएआयडीआय आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची सुविधा देत आहे. यापूर्वी युआयडीएआयने मुदत अनेकदा वाढवल्यामुळे आता पुन्हा एकदा या कामासाठी मुदतवाढ देण्याची शक्यता फारच कमी असल्याचं बोललं जात आहे. १४ सप्टेंबर ही युआयडीएआयने दिलेली मुदतची अंतिम तारीख आहे.
(हेही वाचा – Duleep Trophy 2024 : ‘या’ खेळाडूंनी गाजवली दुलिप करंडकाची पहिली फेरी)
मार्च महिन्यापासून युएआयडीआयने आधार अपडेट (Aadhaar Update) करण्याची ही मुदत अनेकदा वाढवली आहे. पण, यावेळी १४ सप्टेंबर ही तारीख अंतिम असल्याचं बोललं जातंय.
आधार कार्ड मोफत अपडेट (Aadhaar Update) करण्यासाठी या निश्चित मुदतीनंतर, एक महत्त्वाचं काम करण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील. यासाठी ५० रुपये शुल्क भरावं लागणार आहे. विशेष बाब म्हणजे, युआयडीएआय द्वारे प्रदान केलेली आधार कार्ड अपडेट करण्याची ही मोफत सेवा फक्त myAadhaar पोर्टलवर उपलब्ध आहे. ऑफलाईन अपडेटसाठी फी अजूनही लागू होते.
(हेही वाचा – tamhini ghat : घाटाचे सौंदर्य आणि धोके याबाबत संपूर्ण माहिती)
ऑनलाईन आधार कसं अपडेट कराल?
UIDAI ची अधिकृत वेबसाईट https://uidai.gov.in/ वर जा.
होमपेजवरील My Aadhaar पोर्टलवर जा आणि आधार क्रमांक-नोंदणीकृत मोबाईल नंबरवर प्राप्त झालेल्या OTP सह लॉग इन करा.
यानंतर, तुमचे तपशील तपासा आणि तपशील योग्य असल्यास, योग्य बॉक्सवर टिक करा.
डेमोग्राफिक माहिती चुकीची आढळल्यास, ड्रॉप-डाउन मेनूमधून ओळख कागदपत्र निवडा आणि ते अपलोड करा.
लक्षात ठेवा की, हे कागदपत्र JPEG, PNG आणि PDF स्वरूपात अपलोड करता येतं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community