सध्या ओळखपत्र म्हणल्यावर पहिल्यांदा आधार कार्डची विचारणा केली जाते. कारण आधारकार्ड (Aadhar card) वर एखाद्या माणसाचा पत्ता, जन्मतारीख, फोटो यासर्व बाबांची नोंद असते. यापूर्वी १४ डिसेंबर हा दिवस शेवटची तारीख देण्यात आली होती. मात्र आता तीन महिन्यांनी वाढवली आहे. आता १४ मार्च २०२४ पर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करता येणार आहे. (Aadhar free update )
या आधी केंद्र सरकारने जून आधार कार्ड अपडेट करण्यासाठी अधिसूचना जारी केली होती. UIDAI वेबसाइटवर जाऊन मोफत आधार अपडेट करण्यासाठी सरकारने सांगितले होत आणि आता ही मुदत वाढवली आहे. त्यामुळे तुम्ही UIDAIच्या अधिकृत वेबसाइटवर आधार कार्ड अपडेट करू शकता किंवा तुमच्या जवळच्या आधार केंद्राला भेट देऊनही तुमच आधार कार्ड मोफत अपडेट करू शकतात.
(हेही वाचा : LokSabha Intrusion: प्रेक्षक गॅलरीतून लोकसभेच्या सभागृहात एकाने मारली उडी, सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह)
यासाठी तुमच्याकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. यापूर्वी 14 डिसेंबर ही तारीख देण्यात आली होती. मात्र तीन महिन्याचा कालावधी वाढवला असून शेवटच्या दिवसाची वाट न पाहता, आजच तुम्ही तुमच आधार कार्ड अपडेट करून घ्या.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community