नागरिकत्वाचा पुरावा, बॅंक खाते उघडणे, जमीन, घर खरेदी अशा अनेकविध कारणांसाठी आधार कार्ड महत्त्वाचे मानले जाते. देशात आधारकार्डचा पुरावा ग्राह्य धरला जात असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, मात्र आधारकार्ड अपडेट करणे आवश्यक आहे. मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा देत आहे. आता UIDAIने आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. (Aadhar Card)
पुन्हा एकदा UIDAIने (unique identification authority of india) आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत १४ जून २०२४ होती, ती आता १४ सप्टेंबर २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजेच ज्यांनी अद्याप आधार कार्ड अपडेट केलेले नाही, ते १४ सप्टेंबरपर्यंत कोणतेही शुल्क न घेता आधार अपडेट करू शकतात.
(हेही वाचा – Kuwait Fire : कुवेतमधील ४५ भारतियांचे पार्थिव घेऊन हवाई दलाचे विशेष विमान परतले)
आधार कार्ड अपडेट करण्यासाठी अनेक वेळा मुदत वाढवण्यात युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) १० वर्षांपूर्वी बनवलेले आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याची अंतिम मुदत अनेकवेळा वाढवण्यात आली आहे. गेल्या मार्चमध्येदेखील या सेवेचा मोफत वापर करण्याची अंतिम तारीख १४ मार्चपासून १४ जून २०२४ पर्यंत वाढवण्यात आली होती. आता ती १४जून ते १४सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. आता मोफत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी नागरिकांना २ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
१४ सप्टेंबरनंतर भरावे लागणार शुल्क!
आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी शेवटची मुदत १४ सप्टेंबर २०२४पर्यंत आहे. यानंतर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी नागरिकांना पैसे भरावे लागणार आहेत. विशेष बाब म्हणजे UIDAIद्वारे प्रदान केलेली आधार कार्ड अपडेट करण्याची ही मोफत सेवा फक्त myAadhaarपोर्टलवर उपलब्ध आहे. या सेवेची अंतिम मुदत वाढवताना, UIDAIने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले होते की, लोकांना त्यांच्या आधारमधील कागदपत्रे अपडेट करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.
आधार कार्ड अपडेट कसे कराल?
१. सर्व प्रथम, UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर लॉग इन करा.
२. आता होमपेजवरील My Aadhaar Portal वर जा.
३. आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर मिळालेला OTP वापरून लॉग इन करा.
४. यानंतर, तुमचे तपशील तपासा आणि तपशील योग्य असल्यास, योग्य बॉक्सवर टिक करा.
५. लोकसंख्याशास्त्रीय माहिती चुकीची आढळल्यास, ड्रॉप-डाउन मेनूमधून ओळख दस्तऐवज निवडा आणि दस्तऐवज अपलोड करा.
६. हा दस्तऐवज JPEG, PNG आणि PDF म्हणून अपलोड केला जाऊ शकतो.
हेही पहा –
Aadhar Card
Join Our WhatsApp Community