आधार कार्डवरील पत्ता अपडेट करण्यासाठी UIDAI चे नवे नियम! प्रक्रिया झाली एकदम सोपी

229

आधार कार्डवरील पत्ता अपडेट करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने ( UIDAI) ने नवा नियम जारी केला आहे. आतापर्यंत आधार कार्डवरील पत्ता अपडेट करण्यासाठी व्यक्तिगत अ‍ॅड्रेस प्रूफ (Address Proof) सादर करण्याची आवश्यकता होती. परंतु आता अ‍ॅड्रेस प्रूफ न देता कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचे आधार कार्ड पुरावा म्हणून सबमिट करून तुम्ही अगदी सहज तुमचा पत्ता अपडेट करू शकता.

( हेही वाचा : सात लाख रुपयांसाठी मुंबईतून ऊसतोड मजूराचे अपहरण, कर्नाटकातून आरोपीला अटक)

कुटुंबप्रमुखाच्या आधार कार्डचा पुरावा दाखवल्यास तुम्ही अगदी सहज ऑनलाईन पद्धतीने नवा पत्ता अपडेट करू शकता. ज्या आधार कार्ड धारकांकडे पत्ता अपडेट करण्यासाठी स्वत:च्या नावाची कोणतीही कागदपत्रे नाहीत अशा सर्व नागरिकांना ही सुविधा फायदेशीर ठरणार आहे.

आधार कार्डवर पत्ता अपडेट करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज?

शिधापत्रिका (ration card), गुणपत्रिका, विवाह प्रमाणपत्र, पारपत्र (passport) इत्यादी कागदपत्रांच्या माध्यमातून नातेसंबंधाचा पुरावा सादर करून तुम्ही आधार कार्ड अपडेट करू शकता. परंतु तुमचे कुटुंब प्रमुखासोबत काय नाते आहे याचा उल्लेख पुराव्यांमध्ये असणे गरजेचे आहे. जर नात्याचा उल्लेख करणारा कोणताही पुरावा तुमच्याकडे नसेल तर कुटुंब प्रमुखाचे सेल्फ डिक्लरेशन सबमिट करता येणार आहे. विविध कारणांमुळे देशात लोक शहरे आणि नगरांमधून स्थलांतरित होत असल्याने लाखो लोकांसाठी अशा प्रकारची सुविधा फायदेशीर ठरेल.

कसे कराल अपडेट?

  • ऑनलाईन सुविधेचा वापर करण्यासाठी My Aadhar पोर्टलवर जाऊन अ‍ॅड्रेस अपडेट या पर्यायवर क्लिक करा. त्यानंतर अर्ज करणाऱ्याला कुटुंब प्रमुखाचा आधार क्रमांक नमूद करावा लागेल.
  • कुटुंब प्रमुखाच्या व्हेरिफिकेशन प्रक्रियेसाठी अर्जदाराला कुटुंब प्रमुखासोबच्या नात्याचा पुरावा उदा. शिधापत्रिका, पासपोर्ट इत्यादी कागदपत्रे अपलोड करावी लागतील. यासाठी ५० रुपये शुल्क आकारले जाईल. पेमेंटनंतर तुमच्या कुटुंबप्रमुखाच्या मोबाईल क्रमांवर रिक्वेस्ट येईल. ही रिक्वेस्ट तुमच्या कुटुंबप्रमुखाने स्वीकारणे गरजेचे आहे. कुटुंबप्रमुखाने रिक्वेस्ट नाकारल्यास तुमची अ‍ॅड्रेस अपडेट प्रक्रिया पूर्ण होऊ शकणार नाही.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.