…तर तुमचेही ‘आधार कार्ड’ ठरणार अवैध! वाचा

129

आधार कार्ड हे भारतीय नागरिकांचे महत्वाचे ओळखपत्र आहे. अनेक सरकारी आणि गैर-सरकारी कामांसाठी आधार कार्ड हे अनिवार्य असते. या आधार कार्ड संदर्भात युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) महत्वाची माहिती दिली आहे. यापुढे सामान्य दुकानातून अथवा बाजारातून बनवलेले पीव्हीसी कार्ड, प्लास्टिक कार्ड किंवा आधार स्मार्ट कार्ड वैध राहणार नाही. केवळ UIDAI ने जारी केलेले PVC कार्ड वैध असणार आहे.

( हेही वाचा : राज्यात शाळा, महाविद्यालयं सोमवारपासून होणार सुरू? )

UIDAI ने माहिती दिली

UIDAI ने ट्विट करून म्हटले आहे की, ‘ग्राहकाला खुल्या बाजारातून किंवा लोकल दुकानातून घेतलेले PVC कार्ड, प्लास्टिक कार्ड किंवा स्मार्ट आधार कार्ड यापुढे वैध नसेल. UIDAI ने दिलेल्या माहितीनुसार, लोकांनी मार्केटमधून बनवलेले PVC आधार कॉपी वापरणे टाळावे. बाहेरून बनवलेले कार्ड सुरक्षित नसतात. या कारणास्तव त्याच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

( हेही वाचा : रविवारी बाहेर जाताय? मध्ये रेल्वेच्या ‘या’ मार्गावर 14 तासांचा ब्लाॅक! )

UIDAI ने सांगितले आहे की uidai.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड केलेले आधार पूर्णपणे वैध आहे. या कार्डसाठी तुम्हाला फक्त ५० रुपये द्यावे लागतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.