AAI Recruitment 2022 भारतीय विमानतळ प्राधिकरणात नोकरीची सुवर्णसंधी!

92

भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांना नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. विमानतळ प्राधिकरणने कनिष्ठ कार्यकारी, हवाई वाहतूक नियंत्रण या पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. तुम्हालाही याठिकाणी नोकरी करण्याची इच्छा असेल तर अधिकृत वेबसाईट https://www.aai.aero/en/careers/recruitment वर जाऊन अर्ज करावा लागेल. भरतीसाठी अर्ज प्रक्रिया १५ जून २०२२ पासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जुलै २०२२ आहे. या भरती अंतर्गत एकूण ४०० हून अधिक पदांसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे.

( हेही वाचा : बॅंकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी! IDBI आणि IBPS बॅंकेत बंपर भरती, लगेच भरा अर्ज)

( हेही वाचा : गणपतीपुळेमधील MTDC निवासस्थानाला पर्यटकांची पसंती)

अटी व नियम

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरूवातीची तारीख – १५ जून २०२२
    ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ जुलै २०२२
  • शैक्षणिक पात्रता – कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून भौतिकशास्त्र आणि गणितासह B.Sc अथवा अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवाराला १० +२ स्तरावर बोललं आणि लिहल्या जाणाऱ्या इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
  • रिक्त जागा – ज्युनियर एग्झिक्युटिव्ह ( एअर ट्रॅफिक कंट्रोल) – ४००
  • वयोमर्यादा – १४ जुलै २०२२ रोजी कमाल वयोमर्यादा २७ वर्ष असावी. मात्र, शासनाच्या नियमानुसार वयात सवलत दिली जाईल.
  • अधिकृत वेबसाईट – https://www.aai.aero/en/careers/recruitment
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.