आमीर खान म्हणतो रस्त्यावर फटाके फोडू नका! नेटकऱ्यांनी ‘असा’ घेतला समाचार!

दिवाळीच्या तोंडावरच अमीर खान याची जाहिरात आल्याने अमीर हिंदूंच्या सणांच्या विरोधात आहे, असा आरोप सोशल मीडियातून होऊ लागला आहे.

बॉलिवूडचा अभिनेता आमीर  खान याची पत्नी किरण खान हिने ‘आपल्याला भारतात राहणे असुरक्षित वाटत आहे’, असे वक्तव्य केले होते, तेव्हा आमीर खान चर्चेत आला होता. आता आमीर खान हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याला निमित्त स्वतः आमीर खान हाच आहे. त्याने सीएट टायर या कंपनीच्या जाहिरातीमध्ये जे विधान केले आहे, त्यावरून सोशल मीडियात आमीर खान याला नेटकऱ्यांनी चांगलेच फैलावर घेतले आहे.

काय आहे त्या जाहिरातीत? 

अभिनेते आमीर खान याने काम केलेल्या ‘सीएट टायर’ची एक जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यात आमीर खान एका मुलाला म्हणतो की, ‘अनार, सुतळी बाँब आणि भुईचक्र हे सर्व फटाके आपला संघ जिंकला, तर नक्की फोडणार आहोत, परंतु ते रस्त्यांवर नाही. कारण रस्ते हे फटाके फोडण्यासाठी नाही, तर गाड्या चालवण्यासाठी आहेत. त्यामुळे आपल्याला फटाके फोडायचे आहेतच, परंतु ते सोसायटीच्या आवारात, रस्त्यांवर नाही.’ ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच्यावर सोशल मीडियातून जोरदार टीका होऊ लागली आहे. ‘रस्ते हे नमाज पठण करण्यासाठी आहेत का ?’, असे प्रश्‍न विचारत आमीर खान याला ‘हिंदुविरोधी’ असल्याचे म्हटले जात आहे. तसेच आमीर खान आणि सीएट टायर यांच्यावर बहिष्कार घालण्याची मागणी करण्यात आली आहे. दिवाळीच्या तोंडावरच अमीर खान याची जाहिरात आल्याने आमीर हिंदूंच्या सणांच्या विरोधात आहे, असा आरोप सोशल मीडियातून होऊ लागला आहे.

(हेही वाचा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका : भाजपा नंबर १, महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा भाऊ!)

काय म्हणतायेत नेटकरी? 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here