वेगवेगळ्या शासकीय सेवा आणि कागदपत्रांसाठी अर्ज करण्याची सुविधा असलेले आपले सरकार (Aaple Sarkar) पोर्टल पाच दिवस बंद राहणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या (Maharashtra Govt) विविध विभागांच्या सेवा सर्वसामान्य नागरिकांना या पोर्टलवरून उपलब्ध करून दिल्या जातात. तांत्रिक कारणास्तव पाच दिवस पोर्टल ठेवले जाणार आहे. महाराष्ट्र माहिती तंज्ञज्ञान महामंडळाकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. १० ते १४ एप्रिल या काळात हे पोर्टल सर्वच सेवांसाठी बंद असणार आहे.
(हेही वाचा – IPL 2025, Priyansh Arya : ४२ चेंडूंत शतक ठोकणारा प्रियांश आर्य कोण आहे?)
‘आपले सरकार हे पोर्टल महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ नुसार विकसित करण्यात आलेले आहे. नागरिकांना विविध शासकीय सेवांसाठी कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत या उद्देशाने हे सुरू केलेले आहे. नागरिक आपले सरकार पोर्टलवरून सर्वच कामासाठी लागणारी शासकीय प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी या पोर्टलवरून अर्ज करू शकतात. त्याचबरोबर शासकीय सेवांची माहितीही मिळवू शकतात.
या पोर्टलच्या सर्व्हरवरील डेटा स्थलांतर करण्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे १० ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत पोर्टल बंद राहील. या दरम्यान पोर्टलवरील कोणतीही सुविधा उपलब्ध राहणार नाही. ही प्रक्रिया प्रणालीच्या कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी आवश्यक आहे, यासाठी काही कामे असतील, तर ती आजच पूर्ण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Aaple Sarkar)
Join Our WhatsApp Community