आरेत बिबट्याचा पुन्हा हल्ला

आरेत शुक्रवारी सायंकाळी आदर्श नगर परिसरात घरी परतणा-या महिलेवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात महिला थोडक्यात बचावली. महिन्याभरातील ही तिसरी घटना आहे.

प्रवासातून घरी परतणा-या ३२ वर्षीय महिलेवर सायंकाळी आदर्श नगर येथील बस स्थानकाजवळ बिबट्याने हल्ला केला. संगीता गुरव या महिलेवर बिबट्याने हल्ला केला आहे. बसमधून उतरल्यानंतर काही सेकंदातच संगीता यांच्यावर नजीकच्या झाडीत लपलेल्या बिबट्याने हल्ला केला. हा हल्ला बसमधील प्रवाशी तसेच चालकांनी पाहिल्याचे बोलले जात आहे. चालकाने बसमधील हॉर्न जोरजोरात वाजवल्याने महिलेचा जीव वाचला. त्यांना सुरुवातीला आदर्शनगरमधील उपाध्ये रुग्णालयमध्ये दाखल केले गेले. संगीता यांना पुढील उपचारांसाठी जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

( हेही वाचा: मुंबईत या भागात वाढलेत गोवरचे रुग्ण )

याआधी दिवाळीत युनिट क्रमांक १५ तर गेल्या रविवारीही एका माणसावर युनिट क्रमांक १५ येथील तबेल्याजवळील परिसरात बिबट्याने हल्ला केला. महिन्याभरात आरेत दोनदा बिबट्यांना जेरबंद करण्यात आले. मात्र त्यानंतर पुन्हा बिबट्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. हे दोन्ही हल्ले जेरबंद केलेल्या बिबट्यांनी केले नसल्याचे कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून सिद्ध झाल्यानंतर बिबट्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here