Aarey Colony Savarkar Udyan : आरे कॉलनीतील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाची दुरवस्था

दोन ते अडीच वर्षांपूर्वी बनवलेल्या उद्यानाची दुरवस्था झालेली पहायला मिळत आहे.

837
Aarey Colony Savarkar Udyan : आरे कॉलनीतील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाची दुरावस्था
Aarey Colony Savarkar Udyan : आरे कॉलनीतील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाची दुरावस्था
विशेष प्रतिनिधी, मुंबई

शिवसेना उबाठा गटाचे आमदार रविंद्र वायकर यांनी आरे कॉलनीतील मोकळ्या भूखंडाचा विकास म्हाडाच्या निधीतून करत या उद्यानाला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव दिले. परंतु सावरकरांच्या नावे असलेल्या या उद्यानाची दुरवस्था झाली आहे. उद्यानाचा वापर सर्वसामान्य जनतेऐवजी गर्दुल्ले, दारुड्या नशेबाजांसह प्रेमीयुगांकडून केला जात आहे. मात्र स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावे असलेल्या या उद्यानाच्या बकालपणाकडे कोणीही लक्ष देत नाही. शिवसेना उबाठा पक्षाच्या बदलेल्या भूमिकेमुळे इथले आमदार आता उद्यानाच्या देखभालीकडे दुर्लक्ष करत आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. (Aarey colony savarkar udyan)

WhatsApp Image 2024 02 27 at 9.21.27 PM

उद्यानाच्या देखभालीकडे आमदारांचे दुर्लक्ष

आरे कॉलनीतील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उद्यानाचे (Aarey colony savarkar udyan) सुशोभिकरण व नुतनीकरण हे म्हाडाच्या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्यावतीने २०२०-२१च्या क वर्ग पर्यटन निधीतून करण्यात आले होते. या उद्यानाच्या सुशोभिकरण आणि नुतनीकरणाचे लोकार्पण तत्कालिन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. या उद्यानाच्या लोकार्पणानंतर स्थानिक आमदार रविंद्र वायकर यांनी आपल्यासह आपल्या नेत्यांचे फोटो झळकवत सावरकर उद्यानाचे नामफलक प्रत्येक प्रवेशद्वारांवर लावले आहेत. पण या उद्यानाचे लोकार्पण झाल्यानंतर या उद्यानाच्या देखभालीकडे आमदारांचे लक्षच दिसून येत नाही. त्यामुळे दोन ते अडीच वर्षांपूर्वी बनवलेल्या उद्यानाची दुरवस्था झालेली पहायला मिळत आहे.

WhatsApp Image 2024 02 27 at 9.21.28 PM

(हेही वाचा – Sunil Tatkare : सुप्रिया सुळे यांनी टिकेची भाषा सुधारावी अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल – सुनिल तटकरे)

दारुड्या, भिकाऱ्यांसह गर्दुल्ल्यांचा वावर

या उद्यानातील प्रत्येक झाडे पाण्याअभावी सुकून गेली आहेत, गवताचा भाग ओसाड बनला आहे. पायवाटांमध्ये कचरा पसरल्याने चालता येत नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनता उद्यानात जायला तयार नसून याचा फायदा दारुडे, गर्दुल्ले आणि प्रेमी युगुलांकडून घेतला जात आहे. दिवस-रात्र त्यांचाच वावर असतो. दारु पिऊन याच ठिकाणी बॉटल्स टाकल्या जातात. या बॉटल्सच्या काचा सगळीकडे पडलेल्या असतात. त्यामुळे या उद्यानांमध्ये आता सर्वसामान्य जनता सकाळी किंवा संध्याकाळी फिरण्यास किंवा बसण्यास जाण्याची हिंमतही करत नाही.

WhatsApp Image 2024 02 27 at 9.21.27 PM 1

उपनगराच्या पालकमंत्र्यांकडे मागणी

स्थानिक भाजपच्या माजी नगरसेविका प्रिती सातम यांनी यासंदर्भात उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांना पत्र पाठवून या उद्यानाच्या दुरवस्थेबाबत कैफियत मांडून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावे असलेल्या उद्यानाच्या देखभालीसह नुतनीकरणाच्या काम हाती घेऊन सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी केली आहे. सावरकर यांच्या प्रति देशवासियांना आदर आहे. सावरकर यांचे नाव असणाऱ्या या उद्यानाची दुरवस्था झालेली पाहून आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला अतिव दु:ख होत आहे, असे प्रिती सातम यांनी या पत्रामध्ये म्हटले आहे.

WhatsApp Image 2024 02 27 at 9.21.28 PM 1

(हेही वाचा – Maratha Reservation: मराठा आरक्षण विधेयकावर राज्यपालांची सही; शासन निर्णय, बिंदुनामावली आणि राजपत्रही जारी)

सावरकर यांच्या नावासाठी तरी उद्यानाची देखभाल राखायला हवी होती

उबाठा शिवसेनेने काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी सलगी करत आघाडी केली आहे. त्यामुळे त्यांना आता सावरकरांबाबत कोणताही आदर आणि प्रेम राहिलेले नाही. त्यांच्या पक्षाने हिंदुत्वच सोडल्याने त्यांना आता सावरकरांचाही विसर पडू लागला आहे. उद्यानाची दुरवस्था होत असतानाच वायकरांना या उद्यानाची देखभाल राखण्याचा प्रयत्न किमान सावरकर यांच्या नावासाठीही करावासा वाटत नाही, याबाबतही प्रिती सातम यांनी खंत व्यक्त केली आहे.

WhatsApp Image 2024 02 27 at 9.21.29 PM

दुध सागर आणि महानंद वसाहतींमधील रहिवाशांना होतोय त्रास

या उद्यानाच्या शेजारी दुध सागर आणि महानंदा या निवासी वसाहती असून या सर्वांसाठी हे उद्यान म्हणजे डोकेदुखी ठरु लागले आहे. या उद्यानातील नशेबाज लोक आणि विकृत चाळे करणारे प्रेमी युगुल यांच्यामुळे या दोन्ही वसाहतींमधील लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. आमदारांनी आपले फलक लावून या उद्यानाची दुरवस्था करून तमाम सावरकरप्रेमींच्या अवमान केला आहे, असे प्रिती सातम यांनी म्हटले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.