देशभरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी आता ‘आभा हेल्थ कार्ड’; ऑनलाईन करा नोंदणी

219

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून डिजिटल इंडियाची सुरूवात झाली आहे. याचा एक भाग म्हणून भारत सरकारने डिजिटल आभा हेल्थ कार्ड ( Abha Health Card) हा उपक्रम सुरू केला आहे. सर्व नागरिकांसाठी हेल्थ कार्ड आवश्यक असून सर्वांनी या आभा कार्डसाठी नोंदणी करावी असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

( हेही वाचा : जातीय तेढ निर्माण करणाऱ्या 10 युट्यूब चॅनेल्सवर बंदी; जवळपास 45 व्हिडिओ केले ब्लॉक )

आभा हेल्थ कार्डमुळे देशभरातील सर्व रूग्णालयांमध्ये उपचार घेण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध होणार आहे. डिजिटल हेल्थ मिशन अंतर्गत सरकार प्रत्येक व्यक्तीसाठी हे कार्ड बनवत आहे. या कार्डसाठी नागरिकांना कुठे नोंदणी करावी यासाठी कोणती कागदपत्रे लागतात याची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे…

नोंदणी प्रक्रिया कशी करतात ?

  • यासाठी नागरिकांनी सर्वप्रथम healthid.ndhm.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • यानंतर क्रिएट अकाऊंट या पर्याय निवडा.
  • हेल्थ कार्ड नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्सवर क्लिक करा.
  • नाव, पत्ता, फोन नंबर माहिती भरल्यावर तुम्हाला ओटीपी येईल.
  • १४ अंकी डिजिटल हेल्थ कार्डसाठी ऑनलाईन अर्ज भरा, अशाप्रकारे तुम्ही डिजिटल हेल्थ कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

यासाठी लागणारी कागदपत्रे

आधार कार्ड, मोबाईल नंबर, जन्म प्रमाणपत्र ही कागदपत्रं आवश्यक आहेत. या कार्डाद्वारे रुग्णाच्या आरोग्याच्या संबंधित संपूर्ण माहिती नोंदवली जाईल. या कार्डच्या मदतीने डॉक्टर संपूर्ण आरोग्याच्या नोंदी, रुग्णाचे आधीचे आजार याची माहिती घेऊ शकतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.