Slum Redevelopment मध्ये परिशिष्ट २ मधील झोपडीच्या हस्तांतराबाबत अभय योजना लवकरच

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानभवनातल्या उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

311
Slum Redevelopment मध्ये परिशिष्ट २ मधील झोपडीच्या हस्तांतराबाबत अभय योजना लवकरच

झोपडपट्टी पुनर्विकासामध्ये परिशिष्ट २ तयार झाल्यानंतर विकल्या जाणाऱ्या झोपडी हस्तांतरणासाठीही अभय योजना लवकर जाहीर होण्याची शक्यता असून बुधवारी याबाबत विधानभवनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय बैठक घेतल्याने मुंबईतील मोठा तिढा सुटणार असून अनेकांना या निर्णयाचा मोठा दिलासा मिळणार असल्याचे मानले जाते. (Slum Redevelopment)

मुंबईतील अनेक झोपडपट्टी पुनर्वसन योजना २० ते २५ वर्षे रखडल्या आहेत. मात्र या योजनांचे अंतिम परिशिष्ट-२ जाहीर झाल्यानंतर झालेली हस्तांतरणे मान्य करण्याची कोणतीही तरतूद सध्या प्रचलित शासन निर्णयामध्ये नसल्याने मोठा तिढा निर्माण झाला आहे. कारण त्यामुळे परिशिष्ट जाहीर झाल्यानंतर मधल्या काळात कौटुंबिक अडचणीमुळे अनेकांनी झोपड्या विकल्या असल्याने त्या आता ज्यांनी त्या विकत घेतल्या त्यांच्या नावावर होत नाहीत. त्यामुळे योजनांवरही त्यांचा परिणाम झाला ही बाब मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी लक्षात आणून देत मागील अधिवेशनासह याही अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली होती. यावर मुंबईचे सर्वपक्षीय आमदार एकवटल्याने अखेर त्यावेळी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी अभय योजना जाहीर करण्याची घोषणा केली व अधिवेशन काळातच उच्चस्तरीय बैठक घेण्याचे घोषित केले होते. (Slum Redevelopment)

(हेही वाचा – भूखंड घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे CM Siddaramaiah यांच्याविरोधात तक्रार दाखल)

त्यानुसार बुधवारी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्यासह संबंधित अधिकारी व मुंबईतील आमदारांच्या उपस्थितीत ही बैठक विधानभवनात पार पडली. या बैठकीत अभय योजनेच्या नियम, नियमावलीवर चर्चा करण्यात आली. तसेच आमदारांची मतेही जाणून घेण्यात आली असून सरकार याबाबत योजनेचा आराखडा तयार करीत असून ही योजना लवकरच जाहीर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, आम्ही ज्या विषयाचा पाठपुरावा करीत आहोत तो मुंबईकरांचा एक विषय निर्णायक टप्प्यावर आला असून आजच याबाबत तातडीने बैठक घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांचे आम्ही आभार मानतो, अशी प्रतिक्रिया आमदार अँड. शेलार यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना दिली. (Slum Redevelopment)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.