वसईत (Vasai) घृणास्पद प्रकार घडला आहे. एका कंपनीत अज्ञातांनी महिलांच्या पिण्याच्या बॉटलमध्ये लघवी केल्याचे दिसून आले आहे. त्यातील एका महिलेने पाणी समजून ते प्यायल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर कंपनीतील तिन्ही मुलींनी थेट माणिकपूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू माने यांनी दिली. वसई पूर्वेच्या इंमिटेशन ज्वेलरी बनवणाऱ्या विशाल 110 या कंपनीत ही घटना घडली आहे.
(हेही वाचा – खुर्चीसाठी वक्फ बोर्डाचे समर्थन आणि कायद्याला विरोध; MP Naresh Mhaske यांचा उबाठावर हल्लाबोल)
काय आहे प्रकार ?
या कंपनीत मुक्ती बरुड, प्रिती गायकर आणि रेखा जाधव या मुली काम करतात. रात्रीच्या वेळी या कंपनीत दुसऱ्या कंपनीतील चार कामगार झोपण्यासाठी येतात. शुक्रवारी सकाळी कंपनीत आल्यावर त्यातील एक मुलगी पिण्याच्या बाटलीतील पाणी प्यायली. मात्र ते खराब लागल्याने तिने उलटी केली. ती बाटली नीट पाहिल्यानंतर त्यामध्ये युरिन असल्याचे लक्षात आले. इतरही दोन बाटल्यांमध्ये युरिनच ठेवण्यात आले होते.
हा प्रकार रात्री झोपायला आलेल्या कामगारांनीच केल्याचा आरोप या मुलींनी केला. याची तक्रार कंपनीच्या मालकाकडे केली असता त्या मालकाने उलट त्या मुलींवरच संशय घेतल्याची माहिती आहे. (Vasai)
हेही पहा –