MHADA : म्हाडा कोकण मंडळाची सुमारे १४ हजार घरे विक्रीअभावी पडून; सुमारे ३ हजारांचा निधी पडला अडकून

1652
MHADA Konkan Mandal : २१४७ सदनिका, ११० भूखंड विक्रीसाठी ०५ फेब्रुवारीला संगणकीय सोडत
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

म्हाडा (MHADA) कोकण मंडळाच्यावतीने बांधण्यात आलेल्या परंत लॉटरीमध्ये कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने सुमारे १४ हजारांहून अधिक सदनिका विक्रीअभावी पडून राहिल्या आहेत. कोकण मंडळाने बांधलेल्या या घरांची विक्री न झाल्याने तब्बल ३००० ते ३१०० कोटी रुपयांचा निधी अडकून पडला आहे. त्यामुळे कोकण म्हाडाच्यावतीने जागेचा अंदाज न घेता तथा विकसित न झालेल्या जागी बांधकाम केल्याची बाब यामुळे समोर आली आहे.

(हेही वाचा – Plastic Pollution च्या आव्हानावर तोडगा काढणे आवश्यक; भारताचे आयएनसी-5 मध्ये आवाहन)

म्हाडा (MHADA) कोकण मंडळांच्यावतीने मागील काही वर्षांपासून काढण्यात आलेल्या ऑनलाईन विक्रीमध्ये विरा बोळींज, खोणी कल्याण, शिरढोण, गोठेघर ठाणे, भंडार्ली ठाणे आदी ठिकाणच्या सदनिकांचा समावेश होता. ऑनलाईन लॉटरीमध्ये या घरांची विक्रीला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने या घरांची विक्री होऊ शकली. परिणामी, ही घरे पडून असून वारंवार ऑनलाईन विक्रीसाठी लॉटरी काढूनही प्रतिसाद न मिळाल्याने या घरांच्या बांधकामांसाठी खर्च केलेला कोट्यवधी रुपयांचा निधी पडून आहे.

(हेही वाचा – हिंदू देवतांबद्दल घृणास्पद विधान करणाऱ्या मौलाना रशिदीवर गुन्हा दाखल करा; Aniket Shastri Maharaj यांची राज्य सरकारकडे मागणी)

याबाबत म्हाडाचे (MHADA) उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना कोंकण मंडळाच्यावतीने बांधलेल्या सदनिकांची विक्री होत नसलयाने तथा त्यांना प्रतिसाद मिळत नसल्याने मागील एक वर्षांपूर्वी म्हाडाच्यावतीने सर्वकष आढावा घेण्यात आला. त्यामुळे तब्बल १४,०४७ सदनिकांना प्रतिसाद न मिळाल्याने तब्बल ३००० ते ३१०० कोटी रुपयांचा निधी अडकून पडला असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व प्रमुख अधिकाऱ्यांच्या स्तरावर चर्चा करून ज्याठिकाणी दर्जेदार घरांची निर्मिती आणि ठिकाण आदी माहिती घेऊन याचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा – बांगलादेशात दडपशाही सुरुच; ISKCON च्या ५० हून अधिक सदस्यांना भारतात येण्यापासून बांगलादेशाने रोखले)

कोणत्या भागात किती सदनिका?

विरार बोळींज – १७४ (पीएमवाय)

विरार बोळींज – ४१६४

खोणी-कल्याण – २६२१

शिरढोण-कल्याण – ५७७४

गोठेघर-ठाणे – ७०१

भंडार्ली-ठाणे – ६१३

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.