Abu Azmi यांचे संतापजनक विधान; म्हणे, औरंगजेब हा उत्तम प्रशासक

Abu Azmi : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील लढाई ही राजकीय होती. देशात सध्या औरंगजेबाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवली जात आहे, असे दिशाभूल करणारे आमदार अबू आझमी यांनी काढले आहेत.

84

औरंगजेब (Aurangzeb) हा उत्तम प्रशासक होता. त्याच्या राजवटीत भारताची सीमा ही अफगाणिस्तान आणि बर्मा देशापर्यंत होती. त्याच्या काळात भारताला ‘सोने की चिडीयाँ’ म्हणायचे. औरंगजेबाच्या राजवटीत भारताचा जीडीपी 24 टक्के इतका होता. त्यामुळेच इंग्रज भारतात आले, असे संतापजनक उद्गार समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी काढले आहेत. सोमवार, ३ मार्च या दिवशी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी ते विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

(हेही वाचा – पुतिन यांची काळजी करू नका; स्वतःच्या देशात काय चालले ते पहा; Donald Trump यांनी युरोपियन देशांना सुनावले)

अबू आझमी यांनी औरंगजेबाची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. अबू आझमी यांनी म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि औरंगजेब यांच्यातील लढाई धार्मिक नव्हती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील लढाई ही राजकीय होती. देशात सध्या औरंगजेबाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवली जात आहे. औरंगजेबाने त्याच्या काळात अनेक मंदिरं बांधली होती. औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता. त्या काळातील लढाई ही धर्मासाठी किंवा हिंदू-मु्स्लीम अशी नव्हती, असे आझमी बरळले आहेत.

औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना (Chhatrapati Sambhaji Maharaj) ज्याप्रकारे मारले, ती कृती योग्य होती का, या प्रश्नाचे उत्तर न देता अबू आझमी थेट तेथून निघून गेले.

भाजपा आक्रमक, राम कदम भेट देणार इतिहासाचे पुस्तक

या वेळी अबू आझमी (Abu Azmi) यांना त्यांच्या या वक्तव्यावरुन वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. भाजपचे आमदार राम कदम यांनी याबाबत भाष्य केले आहे. अबू आझमी यांना इतिहास माहिती नाही. त्यांचे वक्तव्य चुकीचे आहे. उद्या ते सभागृहात येतील, तेव्हा मी त्यांना इतिहासाचं पुस्तक देणार आहे. औरंगजेबाने आमच्या छत्रपती संभाजी महाराजांना कशाप्रकारे कैदेत ठेवलं, त्यांचा कशाप्रकारे अनन्वित छळ केला, हे अबू आझमी यांना माहिती नाही का, असा प्रश्न भाजपा आमदार राम कदम यांनी उपस्थित केला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.