ABVP Pune University : नाटकात रामायणातील पात्र आक्षेपार्ह दाखवल्याचा ‘अभविप’ चा आरोप, नाटक पाडले बंद

देवी देवतांच्या पात्राच्या मुखातून शिव्या आणि आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली. त्यानंतर अभाविप पुणे महानगरच्या कार्यकर्त्यांनी हे आक्षेपार्ह नाटक बंद केले. हिंदू देवी देवतांबद्दल अशा प्रकारची भाषा मुळीच खपवून घेतली जाणार नाही व संबंधित दोषी विरूध्द कारवाई करण्यात यावी.

348
ABVP Pune University : नाटकात रामायणातील पात्र आक्षेपार्ह दाखवल्याचा ‘अभविप’ चा आरोप, नाटक पाडले बंद

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील ललित कला केंद्र (ABVP Pune University) या विभागाकडून सादर केलेल्या नाटकांमध्ये प्रभू श्रीराम व सीता माता यांची भूमिका विदूषक प्रमाणे दाखवण्यात आल्याचा आरोप अभाविपने म्हणजेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने केला आहे. अभाविपने हे नाटक बंद पाडले आणि कारवाईची मागणी देखील केली आहे.

(हेही वाचा – US Airstrikes in Syria : इराक – सीरियामध्ये रात्री उशिरा अमेरिकेची कारवाई; ८५ ठिकाणी हवाई हल्ले)

नेमकं प्रकरण काय ?

देवी देवतांच्या पात्राच्या (ABVP Pune University) मुखातून शिव्या आणि आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली. त्यानंतर अभाविप पुणे महानगरच्या कार्यकर्त्यांनी हे आक्षेपार्ह नाटक बंद केले. हिंदू देवी देवतांबद्दल अशा प्रकारची भाषा मुळीच खपवून घेतली जाणार नाही व संबंधित दोषी विरूध्द कारवाई करण्यात यावी अशी भूमिका अभाविप पुणे तर्फे घेण्यात आली.

(हेही वाचा – Rani Baug Flower Show : दहा हजार कुंड्यांमधील विविधरंगी फुलांनी वेधले मुंबईकरांचे लक्ष)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात तणावाचे वातावरण –

या नाटकाच्या विरोधात अभविपकडून (ABVP Pune University) जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. या घटनेमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, पोलीस काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाल्यावर परिस्थिती नियंत्रण आणण्यात आली.

(हेही वाचा – BMC Budget 2024-25 : महापालिकेच्या अर्थसंकल्पाबाबत काय आहेत प्रतिक्रिया, जाणून घ्या)

या घटनेबाबत अभाविप (ABVP Pune University) प्रदेश सहमंत्री शुभंकर बाचल म्हणाले की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्र तर्फे रामलीला नाटक आयोजित केले होते. या नाटकामध्ये माता सीता आणि प्रभू श्रीराम यांचा अपमान केल्याचे दिसले. याचा विरोध केल्यावर अभाविपच्या कार्यकर्त्यांवर काठ्यांनी मारहाण करण्यात आली. या घटनेचा अभाविप तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते आणि यामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व प्राध्यापकांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.