हरियाणामध्ये (Haryana) एसीमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. एसीच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्यामुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतामध्ये एका चिमुकल्याचाही समावेश आहे.
(हेही वाचा – आयपीएलच्या १८ वर्षांच्या इतिहासात १ हजार धावांचा टप्पा गाठणारा Virat Kohli ठरला एकमेव फलंदाज)
मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणामधील (Haryana) झज्जर जिल्ह्यातील बहादुरगड शहरातील सेक्टर-९ पोलिस स्टेशनजवळील एका घरात एसी कॉम्प्रेसर फुटल्याने स्फोट झाला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू झाला आहे. एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.हे कुटुंब भाड्याच्या घरात राहत होते. एसीच्या कॉम्प्रेसरचे एकामागे एक दोन स्फोट झाले. दुसऱ्या धमाक्यामुळे आग अधिकच भीषण लागली. शेजारच्यांनी गेट तोडण्याचा प्रयत्न करत एका व्यक्तीला वाचवण्यात यश आले. त्याचे नावं हरपाल असे असून त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले.
(हेही वाचा – Fraud : आरसीएफ कंपनीचे ३१ कोटींचे ६२ चेक चोरीला; दोन धनादेश वठवण्याचा प्रयत्न)
या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. एसीच्या इंडोर युनिटला आग लागल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक तपासातून दिसून आले. पण हा ब्लास्ट दुसऱ्या ज्वलनशील पदार्थामुळेही झालेला असू शकतो, असा संशय आहे. घरात ज्वलनशील पदार्थ कुठून आला? याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे. (Haryana)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community