संपूर्ण प्रवासात ट्रेनमधील एसी बंद; ५० हजार रुपये भरपाई देण्याचे ग्राहक न्यायालयाचे आदेश! काय आहे नेमके प्रकरण?

129

प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वेप्रवासी जास्तीचै पैसे देऊन तिकीट काढतात. परंतु काही प्रवाशांना एसी ट्रेनमधून प्रवास करताना वेगळाच अनुभव आला आहे. एसी डब्यातील आरक्षित तिकीट असतानाही रेल्वे प्रवासात एसी बंद असल्याने ग्राहक न्यायालयात धाव घेतलेल्या प्रवाशाला मोठा दिलासा मिळाला आहे.

( हेही वाचा : पुढच्यावर्षी चार ग्रहणे! मात्र भारतातून दिसणार दोन चंद्रग्रहणे)

संपूर्ण रेल्वे प्रवासात एसी बंद 

शिवशंकर शुक्ला यांनी जून २०१७ मध्ये अलाहाबाद ते मुंबई या दरम्यान दुरांतो गाडीने प्रवास केला. त्यांचे प्रथम एसीचे आरक्षण होते. मात्र संपूर्ण प्रवासादरम्यान रेल्वेत प्रचंड उकाडा होता. यामुळे शुक्ला आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सहप्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली. यावर गाडी सुरू होताच एसी सुरू होईल असे रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. परंतु नंतर गॅस लीक झाल्याचे कारण सांगत संपूर्ण प्रवासदरम्यान रेल्वेत एसी बंद होता यामुळे त्यागाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

५० हजार रुपये भरपाई

या सगळ्या प्रकारानंतर प्रचंड त्रासलेल्या शिवशंकर शुक्ला या प्रवाशाने थेट ग्राहक न्यायालयामध्ये, मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर आणि IRCTC यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी आता निकाल लागला असून ग्राहक न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे.

मानसिक त्रासासाठी ३५ त्रासासाठी आणि खटल्याच्यात खर्चाचे १५ हजार रुपये असे एकूण ५० हजार रुपये शिवशंकर शुक्ला या प्रवाशाला द्यावेत असे आदेश ग्राहक न्यायालयाने दिले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.