ट्रान्स हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार

ट्रान्स हार्बर मार्गावर बंद करण्यात आलेली एसी लोकल सेवा 7 ऑक्टोबर पासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेकडून याबाबतची घोषणा बुधवारी करण्यात आली. या निर्णयानुसार 16 एसी लोकल्स ट्रान्स हा४बर मार्गावर धावणार आहेत.

गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून सर्व मार्गांवरील एसी लोकल ट्रेन्स बंद करण्यात आल्या होत्या. आता पश्चिम रेल्वेवर एसी लोकल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मध्य रेल्वेकडून आता आपल्या उपनगरीय रेल्वे सेवा वाढवण्यावर भर दिला आहे. कोरोनापूर्वीप्रमाणेच ही सेवा 96 टक्क्यांवर आणण्यात येणार आहे.

(हेही वाचाः ऐरोलीत ओव्हरहेड वायर तुटली! हार्बल लोकल ठप्प)

काय आहे वेळापत्रक?

मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 7 ऑक्टोबरपासून ट्रान्स हार्बर मार्गावर पहिली एसी लोकल ट्रेन ही सकाळी 5.44 वाजता पनवेल ते ठाणे अशी धावणार आहे. तर शेवटची एसी लोकल ही रात्री 10.46 वाजता पनवेल येथून सुटून ठाण्यापर्यंत जाणार आहे. सोमवार ते शुक्रवार ही 16 एसी लोकल्सची सेवा ट्रान्स हार्बवर मार्गावर कार्यरत असणार आहे.

इतकी आहे लोकल संख्या

एसी लोकल सेवा सुरू झाल्यानंतर ट्रान्स हार्बर मार्गावर लोकलची 246 ही संख्या वाढून 262 इतकी होणार आहे. मध्य रेल्वेवरील उपनगरीय सेवांची संख्या सध्याच्या 1 हजार 686 वरुन 1 हजार 702 पर्यंत वाढणार आहे. दरम्यान, पूर्णपणे लसीकरण झालेल्या प्रवाशांनाच लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी दिली जात आहे. मात्र त्यासाठी सुद्धा लसीकरणानंतर 14 दिवस पूर्ण झालेले असावेत. तर शासकीय कर्मचारी आणि त्यासंबंधित अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्यास परवानगी दिली गेली आहे.

(हेही वाचाः आमीर खान म्हणतो रस्त्यावर फटाके फोडू नका! नेटकऱ्यांनी ‘असा’ घेतला समाचार!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here