ACB : लाचखोरीच्या ४०२ फायली लालफितीत अडकल्या; २ महिन्यांत १७१ लाचखोरांना बेड्या

34

ACB : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केल्यानंतर परवानगीसाठी संबंधित विभागाकडे फायली पाठवूनही त्यातील ४०२ फायलींना अद्यापही परवानगी न मिळाल्याने त्या लालफितीत अडकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर १३ कोटी ६५ लाखांच्या अपसंपदेच्या १३ फायलींना परवानगी मिळेना, अशी स्थिती आहे. त्यामुळे परवानगीला एवढी दिरंगाई का, असा सवालही या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. (ACB)

एसीबीने कारवाई (ACB action) केल्यानंतर अभियोगपूर्व मंजुरी व पुनर्विलोकनासाठी शासन व सक्षम अधिकाऱ्याकडे न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यासाठी संबंधित विभागाची परवानगी घेण्याची आवश्यकता असते. मात्र, शासन दरबारी व सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीविना ४०२ फायली लालफितीत अडकल्या आहेत. राज्यात २६ फेब्रुवारी २०२५ अखेर लाचेची ११७ प्रकरणे दाखल झाली आहेत. त्यात १७१ आरोपींना अटक केली आहे. पुण्यात दोन (Pune) महिन्यांत सर्वाधिक २४ गुन्हे दाखल असून, त्यामध्ये ३७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

(हेही वाचा – परराष्ट्र मंत्री S. Jaishankar ६ दिवसीय ब्रिटन आणि आयर्लंडच्या दौऱ्यावर)

अपसंपदा गोठविण्याच्याही १३ फायली अडकल्या
ज्ञात उत्पन्नापेक्षा १३ जणांच्या फायली लालफितीत अडकल्याचे एसीबीच्या अहवालावरून (ACB reports) समोर आले आहे. यामध्ये तब्बल १३ कोटी ६५ लाख ८७ रुपयांची अपसंपदा जप्तीची ही प्रकरणे प्रकरणे प्रलंबित आहेत. यामध्ये नगर विकास विभागातील सहा फायली, ग्राम विकास, पोलिस, परिवहन, कृषी, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभाग, आदिवासी विभाग अशी प्रत्येकी एक अशी एकूण १३ प्रकरणे प्रलंबित आहेत. यामध्ये मुंबईतील ४, पुणे २, ठाणे २, नाशिक २, तर अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नांदेड प्रत्येकी एक फाईल परवानगीसाठी अडकली आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.