-
प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त (३१ मे २०२५) त्यांचे जन्मगाव चौंडी (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) येथे श्री क्षेत्र चौंडी विकास आराखड्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी दिले. विधान भवन, मुंबई येथे झालेल्या बैठकीत मुख्य सचिव सुजाता सौनिक, नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे सीईओ आशिष येरेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बावीस्कर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
(हेही वाचा – National Herald Case : गांधी कुटुंब कायद्यापेक्षा मोठे नाही; विनोद तावडेंचा पलटवार)
शिंदे (Ram Shinde) म्हणाले, “चौंडी विकास आराखडा परिपूर्ण असावा. सुव्यवस्थित रस्ते, संग्रहालय, महादेव-चौंडीश्वरी मंदिरांचा जीर्णोद्धार, निवास व्यवस्था, वाहनतळ, स्थानिक उत्पादनांची बाजारपेठ यांना प्राधान्य द्यावे. अहिल्यादेवींच्या जलसंवर्धन, वृक्षसंवर्धन संकल्पनांची जपणूक करावी.” मुख्य सचिव सौनिक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौंडी येथे बैठक घेऊन कामाला गती देण्याचे निर्देश दिले. तसेच, चौंडी येथे होणाऱ्या प्रस्तावित मंत्रीमंडळ बैठकीच्या आयोजनाच्या सूचनाही त्यांनी दिल्या. ग्रामीण ठिकाणी होणारी ही राज्यातील पहिलीच मंत्रीमंडळ बैठक आहे.
(हेही वाचा – “पोपटपंची करत माध्यमांत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न”; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर Pravin Darekar यांचा हल्लाबोल)
या बैठकीत स्थापत्य विशारद किरण कलमदानी यांनी प्रस्तावित आराखड्याचे सादरीकरण केले. चौंडीला देशभरातील पर्यटक आणि इतिहासप्रेमींना आकर्षित करण्यासाठी हा विकास आराखडा महत्त्वाचा ठरेल, असे मत शिंदे (Ram Shinde) आणि सौनिक यांनी व्यक्त केले. यामुळे अहिल्यादेवींचे असामान्य कार्यकर्तृत्व सर्वांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community