
Raigad : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडच्या विकासासाठी राज्य सरकारने केलेल्या आराखड्यास ६०६ कोटींचा निधी मंजूर केला. त्यापैकी १९५.७० कोटींचा निधी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला. आणि आता ३५ कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. परिणामी २८ मार्च २०२३ रोजी एकूण मंजूर ६०६.०९ कोटी पैकी गेल्या दोन वर्षात २३०.७० कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. मात्र, अद्याप ३६५. ३९ कोटी रुपयांचा नियोजित निधी रायगड किल्ला विकास योजनेस (Raigad Fort Development Scheme) प्राप्त झालेला नाही. (Raigad)
किल्ले रायगडच्या विकासासाठी सरकारने कंबर कसली आहे. यासाठी सरकारच्या माध्यमातून ३५ कोटींचा निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली आहे. या निधीमधून पर्यटन विकासाची (Tourism development) कामेही के ली जाणार आहे.
(हेही वाचा – Gold Rate Fall : सोन्याच्या किमती वाढायला हव्यात तिथे कमी का होत आहेत?)
रायगड जिल्ह्यातील किल्ले रायगड किल्ला (Raigad Fort) व परिसर पर्यटन विकासासाठी रु.६०६.०९ कोटी रकमेच्या आराखड्यास संदर्भाधीन क्र.१ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सदर आराखड्यासाठी रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. सदर आराखडयातील कामांसाठी जिल्हाधिकारी, रायगड यांना आतापर्यंत एकूण रक्कम १९५.७० कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. निधी जिल्हाधिकारी, रायगड यांना वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मंजूर करण्यात आलेली रक्कम आहरण करून संबंधितांना वितरीत करण्याकरीता संबंधित सहायक जिल्हा नियोजन अधिकारी / जिल्हा नियोजन अधिकारी यांना आहरण व संवितरण अधिकारी व संबधित जिल्हाधिकारी यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. नियंत्रण अधिकारी यांचा कोड ०००२८ असा आहे. सदर निर्णयानुसार मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाची रक्कम त्यांनी संबधित जिल्हा कोषागार कार्यालयात देयके सादर करून संबधितांना वितरीत करण्यात यावे. सदर कार्यवाहीबाबतचा अनुपालन अहवाल शासनास सादर करण्यात यावा. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता रायगड जिल्हाधिकाऱ्यांनर ५० कोटींचा निधी वितरीत करण्याची विनंती केली आहे. तथापि या आराखड्यातील कामांसाठी प्राप्त झालेला ३५ कोटींचा निधी वितरीत करण्याची बाब विचाराधीन होती.
(हेही वाचा – MLA Residence : मुंबईत आकाशवाणी आमदार निवासात कार्यकर्त्याच्या वडिलांचा मृत्यू)
निधी खर्च करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची
सदर निधी अखर्चित राहणार नाही याची काळजी जिल्हाधिकारी, रायगड यांनी घ्यावी, तसेच संदर्भाधीन क्र. १ येथील शासन निर्णयान्वये मंजूर आराखड्यातील कामांसाठी खर्च करण्यात यावा. या आराखड्यात मंजूर कामाव्यतिरीक्त इतर कोणत्याही प्रयोजनासाठी सदर निधी खर्च होणार नाही याचीही दक्षता जिल्हाधिकारी यांन घ्यायची असल्याचे अध्यादेशातून नमूद करण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community