राज्यात अहिल्याभवन उभारणीस गती; पिंक रिक्षा योजनेअंतर्गत ५ हजार महिलांना रिक्षा वाटप – Aditi Tatkare

56
राज्यात अहिल्याभवन उभारणीस गती; पिंक रिक्षा योजनेअंतर्गत ५ हजार महिलांना रिक्षा वाटप - Aditi Tatkare
  • प्रतिनिधी

राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये अहिल्याभवनचे काम सुरू असून उर्वरित जिल्ह्यांतही मध्यवर्ती ठिकाणी अहिल्याभवन उभारण्याच्या प्रक्रियेस गती देण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिले. महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी आणि सबलीकरणासाठी अहिल्याभवनाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण काम सुरू होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंत्रालयात विभागीय योजनांचा आढावा घेताना त्यांनी ही माहिती दिली. लवकरच चार जिल्ह्यांतील अहिल्याभवनांचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

(हेही वाचा – Maharashtra News : मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळविणे होणार सोपे)

महिला आणि मुलींना रोजगार व सुरक्षित प्रवास मिळावा यासाठी पिंक ई-रिक्षा योजना राबवली जात आहे. या योजनेंतर्गत ५ हजार पात्र महिलांना लवकरच रिक्षा वितरित करण्यात येणार आहेत. तसेच, रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत फिरत्या पथकाने ३ हजारांहून अधिक मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. (Aditi Tatkare)

(हेही वाचा – बांगलादेशी विरुद्ध विशेष पथकाने १२ Bangladeshi Citizens घेतले ताब्यात; ८ जणांना अटक)

कामकाज करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी अंगणवाडी केंद्रासोबत पाळणाघर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाळणा सेविका, मदतनीस आणि निर्भया समुपदेशन केंद्राच्या समन्वयकांचे मानधन वाढविण्याचा विचारही सुरू असल्याचे मंत्री तटकरे (Aditi Tatkare) यांनी सांगितले. माध्यमिक शिक्षणाकडे मुलींचे प्रमाण वाढवण्यासाठी शिक्षण विभागाशी समन्वय साधण्याचाही निर्णय घेण्यात आला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.