कल्याण लोकसभा क्षेत्रातील वाहतूक व दळणवळण प्रकल्पांना गती; खासदार Dr. Shrikant Shinde यांची आढावा बैठक

45
कल्याण लोकसभा क्षेत्रातील वाहतूक व दळणवळण प्रकल्पांना गती; खासदार Dr. Shrikant Shinde यांची आढावा बैठक
  • प्रतिनिधी

कल्याण लोकसभा मतदारसंघासह परिसरातील वाहतूक आणि दळणवळणाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची उभारणी वेगाने सुरू आहे. या प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) मुख्यालयात शुक्रवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

प्रकल्पांचे सविस्तर आढावा विषय : 

या बैठकीत कल्याण रिंग रोड, मेट्रो मार्ग १४, मेट्रो ५ आणि मेट्रो १२ प्रकल्प, ठाणे फ्री वे तसेच उल्हासनगर, अंबरनाथ, आणि कल्याण-डोंबिवली परिसरातील विविध विकासकामांवर चर्चा झाली. खासदार शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांनी प्रकल्पांना गती देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

(हेही वाचा – MLA Sangram Jagtap यांनी हटवले सिद्धटेक येथील सिद्धिविनायक मंदिरासमोरील अतिक्रमण)

प्रमुख विषय आणि निर्णय :

मेट्रो मार्ग १४ : बदलापूर ते कांजुरमार्ग मार्गाचा लाभ अधिकाधिक क्षेत्रांना कसा होईल, यासाठी मार्गाच्या आराखड्यात सुधारणा करण्याचे निर्देश दिले.

कल्याण-डोंबिवलीतील रस्ते प्रकल्प : ३८० कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात येणाऱ्या रस्त्यांचे काम गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

शहाड उड्डाणपूल रुंदीकरण : उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील शहाड उड्डाणपूल रुंदीकरणासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून, जागेचे अधिग्रहण तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

‘यू टाईप’ रस्ते : कल्याण पूर्व भागातील ‘यू टाईप’ रस्त्यांना गती देण्यावर भर दिला.

कल्याण फाटा उड्डाणपूल आणि ऐरोली-काटई फ्री वे : या महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी जागेचे अधिग्रहण जलद गतीने पूर्ण करण्यावर चर्चा झाली.

(हेही वाचा – Accident News : पुणे – नाशिक महामार्गावर भीषण अपघात ; ९ जणांचा मृत्यू)

प्रशासकीय आणि राजकीय अधिकारी उपस्थित :

या बैठकीत अतिरिक्त महानगर आयुक्त मनुज जिंदाल, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड, उल्हासनगर आयुक्त जमीर लेंग्रेकर यांच्यासह कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार शिंदेंचे निर्देश :

प्रत्येक प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी अडचणी दूर कराव्यात आणि नागरिकांना सुविधा लवकर उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश खासदार शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांनी दिले. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे कल्याण लोकसभा क्षेत्रात वाहतूक आणि दळणवळणाच्या समस्या कमी होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.