Eastern and Western express highway वरील ऍक्सेस कंट्रोल प्रोजेक्ट बाळगळणार?

1226
Eastern and Western express highway वरील ऍक्सेस कंट्रोल प्रोजेक्ट बाळगळणार?
Eastern and Western express highway वरील ऍक्सेस कंट्रोल प्रोजेक्ट बाळगळणार?
  • सचिन धानजी,मुंबई

एमएमआरडीएकडून

महापालिकेने (BMS) ताब्यात  घेतलेल्या पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी नियंत्रणात ठेवून मुंबईकरांचा प्रवास सुसाट व्हावा यासाठी प्रवेश नियंत्रण प्रकल्प अर्थात एक्सेस कंट्रोल प्रोजेक्ट हाती घेण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पांसाठी विविध करांसह ११२५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. परंतु हा प्रकल्पच आता बाळगळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील भुयारी मार्गाच्या कामांमध्ये मोठ्या व्यासाच्या जलवाहिनी तर पूर्व उपनगरात काही खासगी जागा संपादित करण्याच्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प जलवाहिनी अन्य वळवण्याशिवाय तसेच खासगी जमिन संपादीत केल्याशिवाय पुढे रेटताच येणार नसल्याने या प्रकल्पाच्या कामाला विलंब होत असल्याची माहिती समोर येत आहे. (Eastern and Western express highway)

 पश्चिम आणि पुर्व द्रुतगती महामार्ग हे नोव्हेंबर २०२२ पासून  एमएमआरडीएकडून महापालिकेला हस्तांतरीत झाले आहेत. एमएमआरडीएकडून एक्सेस कंट्रोलच्या बाबतीत लुईस बर्गर कंपनीकडून विविध आराखडे तयार केले होते. परंतु या प्रस्तावांमध्ये जुने पुल तोडून मोठ्या लांबीचे पूल बांधण्याचा निर्णय घेतला होता. परंतु यासाठी सुमारे दहा हजार कोटींची गरज होती. तसेच यामध्ये पुलाखालून अंडरपास मार्ग काढला जावा,असा आराखडा बनवला होता. परंतु त्यानंतर तत्कालिन अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प)  पी. वेलरासू (P. Velarasu) यांच्याकडे झालेल्या बैठकीत यासाठी होणारा खर्च, कालावधी आणि अडचणी लक्षात घेता प्रथम पुलाखालील जंक्शन बांधण्याचा सर्वोत्तम प्राधान्य देण्याचे सुचवले होते. (Eastern and Western express highway)

(हेही वाचा- PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींनी दिलं तीन गोष्टींना प्राधान्य, वाचा काय म्हणाले पंतप्रधान ?)

 पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर चार ठिकाणी कामे

त्यानुसार या प्रकल्पांतंर्गत पश्चिम द्रुतगती महामार्गावर सुधील फडके फ्लायओवर, पार्ले हनुमान रोड जंक्शन, मिलन सब वे जंक्शन तसचे पूर्व उपनगरांतील बी के सी कनेक्शन आदी चार ठिकाणची कामे हाती घेण्याच निर्णय घेण्यात आला आहे. या कामांसाठी विविध करांसह ११२५ कोटी रुपये खर्च केला जाणार असून यासाठी आरपीएस इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. (Eastern and Western express highway)

खासगी जमिन संपादित करण्याची अडचण

सध्या  बी. के.सी कनेक्टर (B. K. C connector) वरून दक्षिण मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी कोणताही मार्ग उपलब्ध नाही. स‌द्याच्या वाहतूकीला सायन येथून कुर्ला उड्डाणपुलापर्यंत (Kurla Flyover) जावे लगते. त्यामुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोडी निर्माण होते. त्यामुळे ही वाहतूक कोंडी कमी करण्याकरिता बी. के.सी कनेक्टर (B. K. C connector) दक्षिण मुंबईच्या दिशेने इंग्रजी अक्षर  ‘यु’ आकाराचा उड्डाणपुल बांधण्यात येणार आहे. परंतु या पुलाच्या बांधकामांमध्येही खासगी जमिन संपादीत करणे आवश्यक असून त्यामुळे या पुलाचेही काम तातडीने होणे शक्य नसल्याची माहिती मिळत आहे. (Eastern and Western express highway)

(हेही वाचा-  IPL 2024, RCB vs GT : विल जॅक्सच्या शतकानंतर विराटच्या चेहऱ्यावर हसू पसरलं तेव्हा…)

 मोठ्या व्यासाच्या जलवाहिनीचा अडसर

सध्य स्थितीत, पार्ले हनुमान रोड जंक्शनला येणाऱ्या वाहतुकीस पश्चिम द्रुतगती  मार्गावर थेट प्रवेश नाही. कॅप्टन विनायक गोरे उड्डाणपुल आणि पार्ले  पुर्वेकडील वाहतूक विमान जंक्शनकडे वळवली जाते. ज्यामुळे वाहतूक कोडी निर्माण होऊन विमानतळ जंक्शनवर त्याचा विपरीत परिणाम होतो. यामुळे याठिकाणी वाहनांसाठी भुयारीमार्ग बांधण्यात येणार आहे, ज्यामुळे वाहतुकीला थेट पश्चिम द्रुतगती मार्गावर प्रवेश मिळेल. परंतु याठिकाणी बांधकामाच्या आड मोठ्या व्यासाची जलवाहिनी येत असून ही जलवाहिनी अन्यत्र स्थलांतरीत केल्याशिवाय या बांधकामाला सुरुवात करता येणार नाही,अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे या दोन प्रमुख अडसरांमुळे या प्रकल्प कामाला मंजुरी मिळाल्यानंतरही आजतागायत या प्रकल्पाला कागदावरही गती लाभलेली दिसत नाही. (Eastern and Western express highway)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.