ठाणेकरांनो या मार्गांवर रविवारी प्रवेशबंद! हाफ मॅरेथॉनमुळे वाहतुकीत बदल

162

गुरूकुल स्पोर्टस् फाउंडेशन ट्रस्ट व ज्युपिटर फाउंडेशन, ठाणे यांच्यावतीने दिनांक १२ फेब्रुवारी २३ रोजी सकाळी ०५:४५ ते १०:०० वाजेपर्यंत ठाणे शहरात हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉन काळात परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित राहण्यासाठी मॅरेथॉन मार्गांवरील ठराविक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.

वाहतुकीतील बदल पुढील प्रमाणे –

  • प्रवेश बंद –
    टीसीएस सर्कल, हिरानंदानी इस्टेट ते न्यू हॉरीझन स्कूल, टीएमसी मैदान चौकाकडे जाणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना टीसीएस सर्कल येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. तसेच टीपीएस सर्कल, हिरानंदानी इस्टेट ते पातलीपाडा ब्रिजकडे जाणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना टीसीएस सर्कल, हिरानंदानी इस्टेट येथे प्रवेश बंद’ करण्यात येणार आहे.
    पर्यायी मार्ग – ऋतू टॉवर कट, पातलीपाडा ने टीसीएस सर्कल, हिरानंदानी इस्टेट पर्यंत जाणारी वाहिनी दुहेरी करण्यात येत असून सदरदी वाहने टीसीएस सर्कल, हिरानंदानी इस्टेट कडून ब्रम्हांड तसेच पातलीपाडा बिजकडे इच्छीत स्थळी जातील.
  • प्रवेश बंद –
    ऋतू टॉवर पातलीपाडा कडून काबरा बिल्डींग क. ३ ब्रम्हांड सर्कल आझादनगर व ब्रम्हांड सिग्नलकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना ऋतू टॉवर कट, पातलीपाडा येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
    पर्यायी मार्ग – ब्रम्हांड सिग्नल कडून ब्रम्हांड सर्कल आझादनगर, काबरा बिल्डींग क्र.3 ब्रम्हांड मार्गे ऋतु टॉवर कट पातलीपाडा कड़े येणारी वाहिनी दुहेरी करण्यात येत असून ऋतू टॉवर कट पातलीपाडा, काबरा बिल्डिंग क्र.3 ब्रम्हांड ब्रम्हांड सर्कल आझादनगर कडून सिग्नल कडे जाणारी वाहने सदर वाहिनीवरून इच्छित स्थळी जातील.
  • प्रवेश बंद –
    बाळकुम, ढोकाळी कडून एअर फोर्स स्टेशन कोलशेत मार्गे आझादनगर ब्रम्हांड कडे येणाऱ्या सर्व प्रकारव्या वाहनांना लोढा अमरा येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
    पर्यायी मार्ग – बाळकुम, ढोकाळी कडून एअर फोर्स स्टेशन कोलशेत कडे येणारी वाहने ढोकाळी मार्गे कापूरबावडी खालून इच्छित स्थळी जातील,
  • प्रवेश बंद –
    ब्रम्हांड सिग्नल ते संत सेवालाल चौक मानपाडा पावेतो घोडबंदर वाहिनी सर्व्हिस रोड हा सर्व प्रकारच्या वाहनांना ब्रम्हांड सिग्नल व संत सेवालाल चौक मानपाडा येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
    पर्यायी मार्ग – अ) ब्रम्हांड सिग्नल कडून मानपाडा मनोरमानगरकडे सर्व्हिस रोडने जाणारी वाहने ब्रम्हांड सिग्नलपासून मुख्य रस्त्याने मानपाडा ब्रिज संत सेवालाल चौकातून इच्छित स्थळी जातील.
    ब) मानपाडा, मनोरमानगर कडून ब्रम्हांड सिग्नल चे दिशेने सर्व्हिस रोडने जाणारी वाहने मानपाडा ब्रिजखालून ब्रम्हांड सिग्नल येथून इच्छित स्थळी जातील.
  • प्रवेश बंद –
    मानपाडा कडून टिकुजीनीवाडी सर्कल कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मानपाडा ब्रिज येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
    पर्यायी मार्ग – टीकुजीनीवाडी सर्कल कडून मानपाडा दिशेने येणारी बाहिनी दुहेरी करण्यात येत असून मानपाडा कडून टिकुजीनीवाडी सर्कलच्या दिशेने जाणारी वाहने सदर वाहिनीवरून इच्छित स्थळी जातील.
  • प्रवेश बंद –
    टिकुजीनीवाडी सर्कल कडून खेवरा सर्कलच्या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना टिकुजीनीवाडी सर्कल येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
    पर्यायी मार्ग – खेवरा सर्कल कडून टिकुजीनीवाडी सर्कलच्या दिशेने येणारी वाहिनी दुहेरी करण्यात येत असून टिकुजीनीवाडी सर्कल कडून खेवरा सर्कलच्या दिशेने जाणारी वाहने सदर वाहिनीवरुन इच्छित स्थळी जातील.
  • प्रवेश बंद – खेवरा सर्कल कडून डॉ. काशीनाथ घाणेकर सर्कलच्या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना खेवरा सर्कल येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
    पर्यायी मार्ग – डॉ. काशीनाथ घाणेकर चौकातून खेवरा सर्कलच्या दिशेने येणारी वाहिनी दुहेरी करण्यात येत असून खेवरा सर्कलकडून डॉ. काशीनाथ घाणेकर सर्कलच्या दिशेने जाणारी वाहने सदर वाहिनी वरुन इच्छित स्थळी जातील.

ही वाहतूक अधिसूचना दिनांक १२ फेब्रुवारी २३ रोजी सकाळी ०५:४५ ते १०:०० वाजेपर्यंत अंमलात राहील. ही वाहतूक नियंत्रणी अधिसूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरॉडोर, ऑक्सीजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही, असे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी कळविले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.