CSMT स्थानकात अपघात; रेल्वेसेवा विस्कळीत झाल्यामुळे अतिरिक्त १० बस प्रवाशांच्या सेवेत

सीएसएमटी स्थानकातील फलाट क्रमांक १ वरून मंगळवारी सकाळी पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या लोकलच्या डब्याची दोन चाके रुळावरून घसरली यामुळे ऐन गर्दीच्यावेळी हार्बर लोकल गाड्यांचा खोळंबा झाला. या ट्रेनला ग्रीन सिग्नल दिल्यानंतर ही गाडी पुढे जाण्याऐवजी मागे आली आणि ती बफरला धडकली. दरम्यान कर्मचाऱ्यांनी हा घसरलेला लोकल डबा पूर्ववत केला.

( हेही वाचा : गणपतीला रेल्वे गाड्या फुल्ल! असे बुक करा Confirm Tatkal तिकीट, जाणून घ्या प्रक्रिया)

१० अतिरिक्त बसगाड्या

परंतु या घटनेमुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला असून जवळपास दोन ते तीन सीएसएमटी स्थानकातून केवळ प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून वाहतूक सुरू होती. हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे सीएसएमटी ते वडाळा स्थानकादरम्यान १० अतिरिक्त बसेस सोडण्यात आल्या आहेत.

चौकशी होणार

सीएसएमटी स्थानकावर हार्बर मार्गावर प्रवास करण्यासाठी केवळ दोनच फलाट आहेत. हा अपघात फलाट क्रमांक १ वर झाला त्यामुळे फक्त फलाट क्रमांक २ वरून रेल्वे सेवा सुरू होती. यावेळी अप-डाऊन लोकल गाड्यांचे वेळापत्रत विस्कळीत झाले होते. परिणामी विशेष बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अपघाताची चौकशी करण्यात येईल असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here