एका बाजूला मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाले, त्याला काही तास उलटत नाही तोच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर एका सहलीच्या बसला अपघात झाला. खोपोलीमध्ये विद्यार्थी असलेल्या एका लक्झरी बसला हा भीषण अपघात झाला आहे.
कसा झाला अपघात?
ही बस खासगी क्लासेसचे विद्यार्थी घेऊन जात होती. त्यामध्ये ३०-३५ विद्यार्थी होते. त्यापैकी २०-२५ विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. हा अपघात रविवारी, ११ डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजता झाला. रायगड जिल्ह्यात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरही बस मुंबईच्या दिशेने येत होती, त्यावेळी बसच्या वाहकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस पलटली. या भीषण अपघातानंतर लागलीच बचावकार्य सुरु झाले.
(हेही वाचा पाकिस्तानचा खोडसाळपणा; हिंदूंना हिंसक दाखवून बदनाम करणारी वेब सिरीज; ट्रेलरनंतर संतापाची लाट)
स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. चेंबूरमधील एका क्लासचे विद्यार्थी सहलीसाठी खोपोलीला आले होते. विद्यार्थ्यांची सह वेट एँण्ड जॉयला गेल्याची माहिती आहे. या बसमध्ये एकूण 48 विद्यार्थी होते, यातले अनेक जण जखमी तर काही गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Join Our WhatsApp Community