एसटीवर पडला ऊसाने भरलेला ट्रॅक्टरचा ट्रेलर अन्…

118

सोलापूरच्या माढा तालुक्यात एक विचित्र अपघात झाला आहे. चालत्या एसटीवर ऊसाचा ट्रेलर पडल्याने, प्रवाशांची तारंबळ उडाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, वाहतूक कोंडी झाल्याने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला. सोलापूरच्या माढा तालुक्यातील रोकडोबा मंदिरासमोर हा अपघात झाला. यानंतर जवळपास तीन तास ट्राफिक जाम झालं होतं.

अनर्थ टळला

माढ्यातून कुर्डूवाडीच्या दिशेने प्रवाशी घेऊन चाललेल्या एसटी बसवर ऊसाचा ट्रेलर कलला. यात मोठा अनर्थ टळला असला, तरीही तीन तास कोंडी झाल्याने,वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शुक्रवारी सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

( हेही वाचा: रविवारी ‘या’ मार्गावर जाऊ नका! मेगाब्लॉक असणार आहे )

नेमकं काय घडलं

सोलापूरहून कुर्डूवाडीकडे प्रवासी घेऊन चाललेली बस रोकडोबा मंदिरासमोरुन जात होती. त्याचवेळी ऊसाचा ट्रेलरही चालला होता. अचानकच ट्रॅक्टरच्या ट्रेलरचे चाक निघाले. त्यामुळे ऊसाच्या ट्रेलरचा लोड एसटी बसवर पडला. दरम्यान, एसटी प्रवाशांना खाली उतरवण्याची तत्परता चालक आणि वाहकांनी दाखवली. त्यानंतर साडेनऊ वाजता जेसीबीच्या मदतीने ऊसाचा ट्रेलर बाजूला काढण्यात आला. त्यानंतर वाहतूक पूर्वरत झाली. या घटनेमुळे मात्र मोठी वाहतूक कोंडी झाल्याने शेकडो वाहनधारक ताटकळले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.