१७ जुलै रोजी विठ्ठलाच्या नामघोषात आषाढी एकादशीसाठी पालख्या पंढरीकडे मार्गक्रमण करत आहेत. अनेक वाहनांतून वारकरी पंढरपूर गाठत आहेत. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर (Mumbai-Pune Expressway Highway) भीषण अपघात झाला आहे. डोंबिवलीवरून (Dombivli) पंढरपूरला (Pandharpur) जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा अपघात झाला आहे. या ट्रॅव्हल्समधून एकूण 54 वारकरी प्रवास करत होते. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 8 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तसेच 20 ते 30 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.
(हेही वाचा – IAS Pooja Khedekar: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण आता थेट पीएमओकडे!)
ट्रॅव्हल्स अनियंत्रित होऊन थेट 30 ते 40 फूट खड्ड्यात
रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून ट्रॅव्हल्स पंढरपूरच्या दिशेने जात असताना भीषण अपघात झाला. वारकऱ्यांच्या ट्रॅव्हल्ससमोर एक ट्रॅक्टर जात होता. ट्रॅव्हल्सवरचा चालकाचा ताबा सुटला आणि पुढे जाणाऱ्या ट्रॅक्टरवर ट्रॅव्हल्स जाऊन आदळली. पुढे ट्रॅव्हल्स अनियंत्रित होऊन थेट 30 ते 40 फूट खड्ड्यात जाऊन पडली. या वेळी ट्रॅव्हल्समध्ये 54 वारकरी होते. यातील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आलं. सर्व जखमींना एमजीएम रुग्णालय आणि पनवेलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community