Accident News : कर्मचारी गोव्यावरून सहलीहून परतताना भीषण अपघात; 1 ठार 30 जखमी

92
Accident News : कर्मचारी गोव्यावरून सहलीहून परतताना भीषण अपघात; 1 ठार 30 जखमी
Accident News : कर्मचारी गोव्यावरून सहलीहून परतताना भीषण अपघात; 1 ठार 30 जखमी

कंपनीत काम करणारे कर्मचारी सहल आटोपून गोव्यावरून छत्रपती संभाजीनगरकडे (Chhatrapati Sambhajinagar) जाणाऱ्या खाजगी बसला मध्यरात्री भीषण अपघात (Accident News) झाला आहे. कांडगाव (Kandgaon) जवळील तीव्र वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने बस उलटली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, 30 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी 4 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर कोल्हापूरमधील सीपीआर (CPR) आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. (Accident News)

हेही वाचा-Donald Trump 7 दिवसांत बोलले 81,235 शब्द ; व्हाईट हाऊस जास्तीचे स्टेनोग्राफर भरती करण्याच्या विचारात

छत्रपती संभाजीनगरच्या एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गोव्याला सहलीचे आयोजन केले होते. ही सहल आटोपून सर्व जण खाजगी बसने छत्रपती संभाजीनगरकडे परतत होते. मात्र, मध्यरात्री कांडगावजवळच्या वळणावर बसचा तोल गेला आणि ती पलटी झाली. प्रवाशांना सुटका करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि आपत्कालीन सेवांची तातडीने घटनास्थळी धाव घेतली. (Accident News)

हेही वाचा-Maharashtra Weather : राज्यात पुन्हा उकाडा वाढणार ; हवामान विभागाचा अंदाज काय?

मृत आणि जखमी प्रवासी हे सर्व छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक तपासानुसार, तीव्र वळण आणि वेगामुळे बसचा तोल सुटल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, चालक झोपेत होता का? बसमध्ये कोणतीही यांत्रिक बिघाड होती का? याची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. (Accident News)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.