मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai Goa National Highway) परशुराम घाटात रविवारी (१० नोव्हें.) एसटी, ट्रक आणि कार यांचा विचित्र अपघात (Accident News) झाला आहे. सुदैवाने या वाहनांच्या अपघातात एसटी मधील प्रवासी बचावले आहेत. मात्र प्रवासी होते की विद्यार्थी होते हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. (Ratnagiri)
नेमकं काय घडलं?
चिपळूकडून खेडच्या दिशेने येणारी एसटी आणि समोर येणाऱ्या ट्रक यांच्यात अपघात झाला आहे. यामध्ये मागून येणारी कार एसटीवर जोरदार आढळल्याने हा मोठा अपघात झाला आहे. एक कारचालक तर यामध्ये दुचाकीस्वारही जखमी झाला आहे तर एसटी चालकही जखमी झाल्याची माहिती आहे. (Accident News)
मुंबई आणि गोव्याला जाणारी सगळी वाहतूक ही या अपघातामुळे एकाच लेनने सुरू ठेवण्यात आले आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय मार्ग या विचित्र अपघातात एकूण चार वाहन असल्याची माहिती आहे. बसमधून काही मंडळी हे दापोलीकडे पर्यटनासाठी निघाल्याची प्राथमिक माहिती आहे मात्र एसटी मध्ये कोण प्रवासी, विद्यार्थी किंवा कोण पर्यटक होते अधिक तपशील समजू शकलेला नाही. (Accident News)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community