पुणे नाशिक महामार्गावरील (Pune-Nashik highway) नारायणगाव जवळ एक भीषण अपघात (Accident News) झाला आहे. यात आयशर (Eicher) आणि एसटीच्या मध्ये आल्यानंतर मॅक्सीमो गाडीचा (Maximo car) चक्काचूर झाला आहे. या घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या गाडीतील सर्वच 11 प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रवाशांवर नारायणगाव मधील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Accident News)
आयशर टेम्पो ओव्हरटेकच्या प्रयत्नात असताना धडक
याबाबत प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, नाशिक – पुणे महामार्गावर आयशर टेम्पो, प्रवासी वाहतूक करणारी मॅक्सीमो गाडी आणि एसटीमध्ये हा विचित्र अपघात झाला आहे. आयशर टेम्पो हा ओव्हरटेकच्या प्रयत्नात असताना त्याची धडक मॅक्सिमो गाडीला लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. यामध्ये मॅक्झिमो गाडीचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी धाव घेत, जखमींना तात्काळ खासगी आणि शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. (Accident News)
नेमकं काय घडलं ?
पुणे – नाशिक महामार्गावर जात असताना एसटीच्या मागे ही प्रवासी वाहतूक करणारी मॅक्सीमो गाडी जात होती. तर त्याच्या पाठीमागून आयशर गाडी प्रवास करत होती. मात्र आयशरने जोरात धडक दिल्याने मॅक्सीमो गाडी ही बसवर जाऊन आदळली. दोन्ही गाड्यांच्यामध्ये आल्याने मॅक्सीमो गाडी मधील प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहेत. (Accident News)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community