आसनगाव रेल्वे स्थानकात लोकलच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू!

150

आसनगाव रेल्वे स्थानकात लोकलच्या धडकेत वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. रेल्वे रुळ ओलांडून जात असताना हा अपघात झाला आहे. कसाराहून आलेल्या लोकलने धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. दरम्यान, मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

( हेही वाचा : “उद्धव ठाकरे सर्वात मोठे नेते, सर्वांच्या मनात भीती…” राज ठाकरेंच्या सभेनंतर काय म्हणाले संजय राऊत?)

सीताबाई पांढरे असे या वयोवृद्ध महिलेचे नाव असून कसाराहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या १०.५५ च्या N14 नंबरच्या लोकलच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर CSMT कडे जाणाऱ्या रेल्वे वाहतूकीचा खोळंबा झाला होता. आसनगाव रेल्वे स्थानकात २०१८ मध्ये तोडण्यात आलेला ब्रीज अद्याप बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे या मार्गावरील अपघातांची मालिका थांबत नसून वारंवार अपघात होत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.