सीएसएमटी स्थानकात अपघात; लोकलचा एक डब्बा रुळावरुन घसरला,रेल्वे सेवा विस्कळीत

मुंबईतील सीएसएमटी स्थानकात लोकलचा अपघात झाला आहे. पनवेल लोकल पुढे जाण्याऐवजी मागे बफर पर्यंत गेली आणि त्यामुळे रेल्वेचा एक डब्बा रुळावरुन घसरल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातामुळे हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. रेल्वे अधिका-यांना या अपघाताबाबत अद्याप पुरेशी माहिती नाही. या अपघातात प्रवाशांना काही दुखापत झाली आहे का? याची माहिती सध्या प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.

( हेही वाचा: आता स्पर्शाने कळणार, नोट दहाची की शंभरची ? )

सीएसएमटी स्थानकात केवळ 2 प्लॅटफाॅर्म हार्बर मार्गासाठी आहेत. त्यातल्या एका प्लॅटफाॅर्मवर अपघात झाल्याने एकच प्लॅटफाॅर्म वाहतुकीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे हार्बर मार्गावर लोकल गाड्यांचा खोळंबा होऊन वाहतूक विस्कळीत झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here