मुंबई आणि ठाण्याला जोडणारा घोडबंदर रोड हा सर्वात महत्वाचा मार्ग आहे. हा मार्ग ज्या ठिकाणी जोडला जातो, तो रस्ता मुंबई – अहमदाबाद महामार्गाला जोडतो. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी तसेच वसई-विरारपासून पालघर जिल्हा पुढे गुजरातपर्यंत जातो, त्यामुळे त्याठिकाणी जाणारेही या मार्गावरून ये-जा करतात, अशा घोडबंदर रोडवर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरु असते. या मार्गावर अपघातांची संख्या वाढत आहे, हे चिंतेची बाब बनली आहे.
Very soon Ghodbunder Road will be awarded as the most dangerous road in the world. Video by Swaraj Khandekar. #thane #Mumbai pic.twitter.com/yfLfYAQyZq
— Sneha (@QueenofThane) September 6, 2023
या मार्गावरून एक ट्रक भरधाव वेगाने येत असताना अचानक मार्गावरून बाहेर कोसळला आणि तो खोल खड्ड्यात पडला. या अपघाताचे ट्विट सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. समाजसेविका स्नेहा यांनी हे ट्विट केले आहे. त्याला कॅप्शन देताना स्नेहा यांनी लवकरच घोडबंदर रोडला जागतिक पातळीवर सर्वात धोकादायक रस्ता असा पुरस्कार दिला जाईल, असे लिहिले आहे.
(हेही वाचा G20 बैठकीत झळकणार ऋग्वेदाचे हस्तलिखित)
Join Our WhatsApp Community