नागपूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. भरधाव कंटेनर आणि २ ट्रॅव्हल्स एकमेकांना धडकल्या. अपघात इतका भीषण होता की, तिन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. या घटनेत जवळपास २० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
जखमीपैंकी ४ ते ५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातामुळे नागपूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लावल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
(हेही वाचा – Mumbai Metro: पावसामुळे मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या, कसे असेल वेळापत्रक ? वाचा सविस्तर)
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथून छत्रपती संभाजीनगरकडे कंटेनर येत होता. त्याचवेळी पुणे येथून प्रवाशांना घेऊन २ खासगी ट्रॅव्हल्स अमरावतीच्या नागपूरच्या दिशेने येत होत्या. कारंजा तालुक्यातील पेडगाव येथे पहाटेच्या सुमारास तिन्ही वाहने एकमेकांना धडकली.
तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान…
अपघात इतका भीषण होता, की तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. या घटनेत ट्रॅव्हल्समधील २० प्रवासी जखमी झाले. यातील ४-५ प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. जखमींना कारंजा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
अल्पवयीन मुलाचा ट्रकखाली येऊन मृत्यू…
सुसाट वेगात असलेल्या ट्रकने एका अल्पवयीन मुलगा ट्रकखाली येऊन त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. अश्विन आठवले (१७) असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. काटोल रोडवरील गोरेवाडा झू परिसरात गुरुवारी (ता. २० जून) रात्री उशीरा ही घटना घडली आहे. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community