हे अपघात जाणीवपूर्वक होत आहेत; Mysore-Darbhanga Express Accident नंतर केंद्रीय मंत्र्यांचे मोठे विधान

115
हे अपघात जाणीवपूर्वक होत आहेत; Mysore-Darbhanga Express Accident नंतर केंद्रीय मंत्र्यांचे मोठे विधान
हे अपघात जाणीवपूर्वक होत आहेत; Mysore-Darbhanga Express Accident नंतर केंद्रीय मंत्र्यांचे मोठे विधान

बिहारमध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदावी अशी आम्ही माता राणीकडे प्रार्थना करतो. बिहारमध्ये गेल्या २०-२२ वर्षांपासून जशी परस्पर बंधू-भावाची भावना आहे, तशीच कायम राहो. तसेच रेल्वे अपघाताबाबत ते म्हणाले की, रेल्वे अपघात तर होतच राहतात. हे अपघात जाणीवपूर्वक होत आहेत. याबाबत रेल्वे मंत्रालय (Mysore-Darbhanga Express Accident) चौकशी करत असून लवकरच कारवाई केली जाईल, असा इशारा केंद्रीय मंत्री ललन सिंह (Lalan Singh) यांनी दिला आहे.

(हेही वाचा – Baba Siddique Shot Dead: बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस यांचे शरद पवारांना प्रत्त्युत्तर; म्हणाले…)

तिरुवल्लूरमध्ये (Tiruvallur) ट्रेनचा भीषण अपघात झाला आहे. म्हैसूर – दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक झाली. या वेळी एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना आग लागली, तर १२ ते १३ डबे रुळावरून घसरले. या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तामिळनाडूमध्ये शुक्रवारी ताशी ७५ किलोमीटर वेगाने धावणारी एक्स्प्रेस ट्रेन मेन लाईवर जाण्याऐवजी लूप लाईनमध्ये घुसली आणि उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून एका डब्याला आग लागली आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कसा झाला अपघात ?

म्हैसूरहून बिहारच्या दरभंगाला जाणारी बागमती एक्स्प्रेस चेन्नईजवळ मालगाडीला धडकली, त्यानंतर ट्रेनला आग लागली. शुक्रवारी सायंकाळी कवरपेट्टई रेल्वे स्थानकाजवळ ही भयंकर घटना घडली. या अपघातात १९ जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर अडकलेल्या प्रवाशांना बसने पोनेरी येथे नेण्यात आले आणि नंतर दोन ईएमयू विशेष गाड्यांद्वारे चेन्नई सेंट्रलला नेण्यात आले. (Mysore-Darbhanga Express Accident)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.