देशात कोरोना संकटामुळे आर्थिक दरी आणखी रुंदावली असून, श्रीमंत आणखी श्रीमंत, तर गरीब आणखी गरीब म्हणजे तब्बल 30 वर्षे मागे गेला आहे. पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेने जाहीर केलेल्या अहवालानुसार, देशातील प्रमुख एक टक्के लोकसंख्येकडे राष्ट्रीय उत्पन्नाचा 5 ते 7 टक्के हिस्सा आहे, तर 15 टक्के कामगारांची महिन्याची कमाई 5 हजारपेक्षा कमी आहे. केवळ 10 टक्के लोक सरासरी 25 हजार रुपये कमवतात. देशाच्या एकूण उत्पन्नात त्यांचा वाटा 30 ते 35 टक्के इतका आहे.
गरिबांचे उत्पन्न घटले
श्रमशक्ती सर्वेक्षण आकडेवारीचा हवाला देत परिषदेने अहवालात म्हटले आहे की, देशातील प्रमुख एक टक्के लोकांची कमाई 2017 ते 2020 दरम्यान, 15 टक्क्यांनी वाढली असली, तरी 10 टक्के सर्वात कमी उत्पन्न असणा-यांचे उत्पन्न या दरम्यान एक टक्क्यांनी कमी झाले आहे. ग्रामीण आणि शहरी क्षेत्रामध्ये मासिक उत्पन्नातही मोठे अंतर आहे. देशातील तब्बल 50 टक्के लोकसंख्येकडे नगण्य संपत्ती आहे.
( हेही वाचा: केतकीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ, जामिनासाठी अर्ज करणार)
Join Our WhatsApp Community