दोन महिन्यांनी पुन्हा विजसंकट?

152

कडक उन्हाळ्यातही भारनियमनाचे चटके लोकांना सहन करावे लागले. राज्यात कोळशाचा साठा मर्यादित असल्याने, भारनियमन करावे लागले होते. वीजसंकट गहिरे झाले होते. मात्र, कोळशाचा पुरवठा पूर्वरत झाल्याने, संकट टळले. परंतु, आता पुन्हा जुलै- ऑगस्टमध्ये वीजसंकट निर्माण होण्याचे संकेत आहेत.

सीआरईएचा अहवाल

सेंटर फाॅर रिसर्च ऑन एनर्जी अॅंड क्लीन एअर या संस्थेने वीजसंकटाबाबत भाकीत केले आहे. सीआरईएच्या अहवालानुसार, जुलै- ऑगस्ट महिन्यात कोळशाचा साठा मान्सूनपूर्व स्थितीत असेल. त्यामुळे देशात पुन्हा कोळशाची टंचाई जाणवू लागेल आणि त्याचा परिणाम वीजनिर्मीतीवर होईल. तुर्तास कोळशाचा साठा 13.5 दशलक्ष टन एवढा असून सर्व वीजनिर्मीती कंपन्यांकडे 20.7 मेट्रीक टन कोळसा आहे.

( हेही वाचा: व्लादिमीर पुतीन यांचा गंभीर आजारामुळे मृत्यू; ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेच्या दाव्याने खळबळ )

एवढी असेल मागणी

सेंट्रल इलेक्ट्रिसीटी अॅथाॅरिटी ऑफ इंडिया यांच्या अनुसार ऑगस्ट महिन्यात 214 गिगावाॅट विजेची आवश्यकता असेल. तसेच, सुमारे 1 लाख 33 हजार 426 दशलक्ष युनिट विजेची मागणी या महिन्यात असेल. मान्सूनमुळे कोळशाच्या वाहतुकीत व्यत्यय येऊ शकतो, ही शक्यता गृहीत धरुन त्यानुसार, वाहतुकीचे नियोजन केले जाणे गरजेचे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.