पावसाळा दोन महिन्यांवर आला आहे. तसेच पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून सध्या मुंबई महानगरपालिका नालेसफाईच्या कामाला लागली आहे. अशातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईत 74 ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका असल्याचे जिऑलाॅजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
दुर्घटना टाळण्यासाठी पालिकेच्या उपाययोजना
सर्वेक्षणातून समोर आलेल्या या माहितीनंतर आता मुंबई प्रशासन कामाला लागले आहे. या धोक्याच्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधणे, नागिरकांना धोक्याचा इशारा देणे आणि दुर्घटना टाळण्यासाठी पालिकेने आवश्यक उपाययोजनांची कार्यवाही सुरु केली आहे. मुंबईच्या अनेक भागांत असलेल्या डोंगराच्या ठिकाणी शेकडोंच्या संख्येने झोपडपट्ट्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे अतिवृष्टीमध्ये या ठिकाणी भूस्खलन, दरड कोसळणे अशा दूर्घटना होतात.
संरक्षक भिंत बांधली जाणार
मुंबईतील आमदार, खासदार नगरसेवकांसह लोकप्रतिनिधींनी 1200 ठिकाणी दरडी असल्याने, संरक्षक भिंत बांधण्याच्या सूचना केल्या होत्या. याबाबत पालिका आणि म्हाडासह केलेल्या बैठकीनंतर 621 ठिकाणी दरडींचा धोका असल्याचे निदर्शनास आले. यानंतर मुंबईत 47 ठिकाणी अतिधोकादायक तर 25 ठिकाणे धोकादायक दरडी असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
( हेही वाचा: डेक्कन क्वीनमध्ये आता चॅटबाॅट सुविधा, असा करा मजेशीर प्रवास! )
या ठिकाणी दरडीचा धोका
वाॅर्ड अतिधोकादायक धोकादायक
डी 1 4
ई 0 2
एफ/ दक्षिण 2 2
एफ/ उत्तर 1 2
जी/ दक्षिण 0 1
के/पूर्व 1 2
के/ पश्चिम 2 0
पी/ दक्षिण 1 0
पी/ उत्तर 3 0
आर/उत्तर 1 0
आर/ मध्य 0 2
एल 7 2
एम/ पूर्व 4 1
एन 14 1
एस 7 3
टी 2 2
Join Our WhatsApp Community